“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:59 IST2026-04-11T10:59:49+5:302026-04-11T10:59:49+5:30

Supreme Court: प्रत्येक धोरणात्मक बाबतीत न्यायपालिका हा शेवटचा आधार आहे, पहिला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

do not go to court for everything said supreme court while dismisses 25 public interest litigation | “प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका

“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका

Supreme Court: गेल्या अनेक वर्षांपासून न्यायव्यवस्थेवरील ताण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातली सर्वच न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, याचा ताण न्यायमूर्तींवरही येत आहे. यातच प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात येऊ नका, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने एकाच सुनावणी २५ जनहित याचिका फेटाळ्याची माहिती मिळाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांनी सर्वप्रथम संबंधित प्रशासकीय आणि संबंधित प्राधिकरणांकडे संपर्क करावा. तेथे कोणतीही कारवाई न झाल्यासच न्यायालयात हस्तक्षेपासाठी यावे. विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना शिक्षित करणे आणि संवेदनशील बनवणे ही पहिली पायरी असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

न्यायपालिका हा पहिला नाही, शेवटचा पर्याय

पुढे खंडपीठाने स्पष्ट केले की,  वकिलांनी मुद्दे समजून घेऊन योग्य ठिकाण निवडणे अपेक्षित आहे. प्रत्येक धोरणात्मक बाबतीत न्यायपालिका हा शेवटचा आधार आहे, पहिला नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जातीय जनगणनेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सरन्यायाधीशांनी याचिकेतील मजकूर आणि वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. तुम्ही अशी भाषा कुठून शिकता? तुम्हाला या प्रकारची अपमानास्पद भाषा कुठून मिळते? तुम्ही याचिका कशा लिहिता?, असे थेट सवाल याचिकाकर्त्यांना केले.

दरम्यान, फेटाळलेल्या याचिकांमध्ये एकसमान भाषा धोरण, साबणातील रसायनांवर नियमन आणि देशव्यापी अन्न नोंदणी मोहिमेची मागणी करण्यात आली होती. एका जनहित याचिकेत भिकारी आणि तृतीयपंथी लोकांसारख्या वंचित गटांच्या उन्नतीसाठी धोरण तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. ९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुप्ता यांनी दाखल केलेल्या पाच जनहित याचिका निरर्थक असा शेरा मारून फेटाळून लावल्या. एका याचिकेत कांदा आणि लसूणमध्ये "तामसिक" (नकारात्मक) ऊर्जा आहे की नाही हे ठरवण्यासाठी वैज्ञानिक अभ्यासाची मागणी करण्यात आली होती.

 

Web Title : सुप्रीम कोर्ट ने खारिज की बेबुनियाद PIL, पहले अधिकारियों से संपर्क करने की सलाह

Web Summary : सुप्रीम कोर्ट ने नागरिकों से अदालतों का रुख करने से पहले अधिकारियों से संपर्क करने का आग्रह किया। पच्चीस जनहित याचिकाएं खारिज की गईं। न्यायालय ने जोर दिया कि प्रशासनिक और संबंधित अधिकारियों से संपर्क करना पहला कदम होना चाहिए, न्यायिक हस्तक्षेप अंतिम उपाय। न्यायालय ने जाति जनगणना संबंधी याचिका भी खारिज कर दी।

Web Title : Supreme Court Rejects Frivolous PILs, Advises Approaching Authorities First

Web Summary : Supreme Court urges citizens to approach authorities before courts. Twenty-five public interest litigations were dismissed. The court emphasized that approaching administrative and relevant authorities should be the first step, with judicial intervention as a last resort. The court also rejected a plea regarding caste census.