द्रमुककडून  भ्रष्टाचाऱ्यांची, माफियांची पाठराखण; प्रचार मोहिमेत पंतप्रधान मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:30 IST2026-01-24T14:28:53+5:302026-01-24T14:30:26+5:30

"केरळच्या विकासासाठी प्रयत्नांची जनतेला जाणीव"

DMK supporting corrupt people mafia PM Modi alleges in campaign | द्रमुककडून  भ्रष्टाचाऱ्यांची, माफियांची पाठराखण; प्रचार मोहिमेत पंतप्रधान मोदींचा आरोप

द्रमुककडून  भ्रष्टाचाऱ्यांची, माफियांची पाठराखण; प्रचार मोहिमेत पंतप्रधान मोदींचा आरोप

मदुरंतकम: तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारचा पराभव करण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी येथील सभेत शुक्रवारी सांगितले. करप्शन, माफिया, क्राइम- (सीएमसी) यांची पाठराखण करणारे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी या सभेने तिथे निवडणूक प्रचार मोहिमेची सुरुवात केली. या सभेला अण्णाद्रमुक, एएमएमके, पीएमके (अनुमानी गट) यासह एनडीएतील अन्य घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी म्हणाले की, द्रमुकच्या वाईट कारभारापासून सुटका व्हावी, असे जनतेला वाटत आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर यावे यासाठी तामिळनाडूतील जनता उत्सुक आहे. मुरुगन मंदिरातील कार्तिगाई दीप प्रज्वलन वादाप्रसंगी आमचे नेते भक्तांच्या हक्कांसाठी उभे राहिले; पण द्रमुकने मतपेढीचा विचार करत भक्तांची साथ सोडली.

‘केरळच्या विकासासाठी प्रयत्नांची जनतेला जाणीव’

तामिळनाडूसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळचाही दौरा केला. त्यावेळी त्यांनी केरळमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले व तीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या तसेच त्रिशूर–गुरुवायूर प्रवासी ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. या राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी जनतेला जाणीव असल्याचे मोदी यांनी सांगितले, तसेच त्यांनी सीएसआयआर-एनआयआयएसटी हब प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

‘जनतेचे प्रेम मला मिळते’

तिरुवअनंतपुरम येथील कार्यक्रमात एक मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वतः काढलेले चित्र हातात धरून उभा होता. ते पाहून मोदी म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी दौऱ्यादरम्यान माझ्याबद्दल तरुण मंडळी विविध प्रकारे प्रेम व्यक्त करतात. मात्र, अशा गोष्टींना टीकाकार नाटक किंवा पूर्वनियोजित गोष्ट म्हणून हिणवतात.

Web Title : द्रमुक भ्रष्टाचारियों, माफियाओं का संरक्षक: पीएम मोदी का आरोप

Web Summary : पीएम मोदी ने द्रमुक पर तमिलनाडु में भ्रष्टाचार और माफिया को संरक्षण देने का आरोप लगाया। उन्होंने चुनाव अभियान शुरू करते हुए द्रमुक के शासन की आलोचना की। उन्होंने केरल में विकास परियोजनाओं पर भी प्रकाश डाला, और केंद्र सरकार के प्रयासों के बारे में जनता की जागरूकता पर ध्यान दिया।

Web Title : DMK shields corrupt, mafia: PM Modi alleges in campaign rally.

Web Summary : PM Modi accuses DMK of protecting corruption and mafia in Tamil Nadu. He launched the election campaign, criticizing DMK's governance. He also highlighted development projects in Kerala, noting public awareness of the central government's efforts.