द्रमुक नेत्याच्या मुलानेच तयार केले होते रुपयाचे चिन्ह '₹', हिंदीविरोधात CM स्टॅलिन विसरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:45 IST2025-03-13T16:45:15+5:302025-03-13T16:45:22+5:30

तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्हच हटवले आहे.

DMK leader's son created the rupee symbol '₹', anti-Hindi CM Stalin forgot | द्रमुक नेत्याच्या मुलानेच तयार केले होते रुपयाचे चिन्ह '₹', हिंदीविरोधात CM स्टॅलिन विसरले...

द्रमुक नेत्याच्या मुलानेच तयार केले होते रुपयाचे चिन्ह '₹', हिंदीविरोधात CM स्टॅलिन विसरले...

Tamilnadu News : भारताचे चलन असलेल्या रुपयाचे अधिकृत चिन्ह म्हणून  '₹' चिन्हाचा वापर केला जातो. मात्र आता सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या हिंदी vs तामिळ भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्हच हटवले आहे. या चिन्हाची जागा 'ரூ' या तामिळ चिन्हाने घेतली आहे.

तमिलनाडु में विधानसभा चुनाव से पहले डीएमके सरकार ने बजट 2025-26 से रुपये के राष्ट्रीय चिह्न को हटा दिया है. इसके बजाय तमिलनाडु सरकार ने अपने बजट में  '₹' को 'ரூ' सिंबल से रिप्लेस कर दिया है. तमिल भाषा में 'ரூ' इस तमिल वर्ण का मतलब रु होता है. हालांकि भाषा की राजनीति करते हुए '₹' को बजट से हटाने वाली तमिलनाडु सरकार ने ये ध्यान देना जरूरी नहीं समझा कि रुपये के इस सिंबल को एक तमिल ने ही डिजाइन किया था. खास बात यह है कि इस सिंबल को डिजाइन करने वाले उदय कुमार धर्मलिंगम के पिता भी DMK के नेता थे. 

तामिळनाडूतील DMK सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पातून रुपयाचे राष्ट्रीय चिन्ह काढून, त्याऐवजी 'ரூ' चिन्ह लावले आहे. तमिळ भाषेत या 'ரு' चा अर्थ रुपये, असा होतो. विशेष म्हणजे, भाषेचे राजकारण करणाऱ्या स्टॅलिन सरकारने अर्थसंकल्पातून ज्या '₹' चिन्हाला काढून टाकले, ते चिन्ह एका तमिळ व्यक्तीने डिझाइन केले आहे. उदयकुमार धर्मलिंगम हे भारतीय शिक्षणतज्ञ आणि डिझायनर आहेत. त्यांनीच भारतीय रुपयाचे चिन्ह (₹) डिझाइन केले आहे. महत्वाची बाब म्हणजे, उदय कुमार धर्मलिंगम यांचे वडील द्रमुक नेते होते.

द्रमुक नेत्याच्या मुलाने बनवले रुपयाचे चिन्ह
उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील एन धर्मलिंगम द्रमुकचे आमदार होते. उदयकुमार धर्मलिंगम हे देशातील प्रसिद्ध डिझायनर आहेत. जेव्हा मुलाने ही स्पर्धा जिंकली होती, तेव्हा त्यांनी हा खूप अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले होते. मुलाने तामिळनाडूला गौरव मिळवून दिला, अशी प्रतिक्रिया उदयकुमारच्या वडिलांची होती.

कधी लागू झाले (₹) चिन्ह?
उदयकुमार धर्मलिंगम यांनी भारतीय तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन देवनागरी 'र' आणि रोमन अक्षर 'R' एकत्र करून रुपयाचे चिन्ह ₹ तयार केले होते. हे नवीन चिन्ह 15 जुलै 2010 रोजी भारत सरकारने लोकांसमोर सादर केली. अर्थ मंत्रालयाने आयोजित केलेल्या खुल्या स्पर्धेद्वारे या चिन्हाची निवड करण्यात आली होती. यासाठी 3,331 अर्ज प्राप्त झाले होते, ज्यामध्ये पाच अंतिम डिझाइनपैकी उदयकुमारचे चिन्हही होते. भारतीय चलनाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यात उदयकुमार यांचे हे योगदान महत्त्वाचे होते.

भाजपने साधला निशाणा
तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी द्रमुक सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "द्रमुक सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. हे डिझाइन एका तमिळ व्यक्तीने तयार केले होते आणि संपूर्ण भारताने स्वीकारले. हे चिन्ह तयार करणाऱ्या उदयकुमारचे वडील द्रमुक आमदार होते. मुख्यमंत्री स्टॅलिन, तुम्ही किती मूर्ख असू शकतात..." अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील सीएम स्टॅलिन यांच्यावर तामिळनाडूच्या लोकांचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "उदय कुमार धर्मलिंगम हे भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहेत. एका द्रमुक नेत्याच्या मुलाने बनवलेले डिझाइन संपूर्ण भारताने स्वीकारले. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे तामिळनाडूच्या 2025-2025 च्या अर्थसंकल्पातील कागदपत्रातून रुपयाचे चिन्ह काढून तामिळनाडूच्या जनतेचा अपमान करत आहेत," असा आरोप त्यांनी केला. 

Web Title: DMK leader's son created the rupee symbol '₹', anti-Hindi CM Stalin forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.