तामिळनाडूत राज्यपाल vs सरकार; मंत्र्याची राज्यपालांवर भाजप एजंट असल्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:51 IST2023-06-16T15:36:59+5:302023-06-16T15:51:09+5:30
DMK Hits Out Governor RN Ravi: तमिळनाडूतील डीएमके सरकारने राज्यपालांकडे फाईल पाठवली, राज्यपालांनी स्वाक्षरी न करता परत केली.

तामिळनाडूत राज्यपाल vs सरकार; मंत्र्याची राज्यपालांवर भाजप एजंट असल्याची टीका
DMK Hits Out Governor RN Ravi: दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूत सरकार vs राज्यपाल परिस्थिती निर्माण होत आहे. स्टॅलिन सरकारमधील मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यापासून केंद्र सरकार आणि द्रमुक यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यातच तामिळनाडूचे मंत्री के पोनुमुदी यांनी गुरुवारी (15 जून) राज्यपाल आरएन रवी यांच्यावर भाजप एजंट असल्याची टीका केली.
द्रमुक सरकारकडून सेंथिल बालाजी यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार इतर कोणाला तरी देण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे फाइल पाठवण्यात आली होती. राज्यपालांनी ती फाईल परत केली. यानंतर स्टॅलिन सरकारमधील मंत्री पोनुमुदी यांनी राज्यपाल आर.एन. रवी यांच्यावर टीका करत, भाजप एजंटसारखे वागू नका असे म्हटले.
दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती - राज्यपाल
मीडिया रिपोर्टनुसार, मंत्री पोनुमुदी यांनी सांगितले की, सीएम एमके स्टॅलिन यांनी व्ही सेंथिल बालाजी यांच्याऐवजी इतरांना मंत्रिपद देण्यासंदर्भातील फाईल राज्यपालांनी परत केली. फाईलमध्ये दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती असल्याचे कारण देत राज्यपालांनी फाईल परत केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीनंतर पोनुमुदी म्हणाले की, पुन्हा एकदा राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे फाइल पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला वाटतं की, राज्यपाल ही फाईल मान्य करतील आणि भाजपच्या एजंटसारखे वागणार नाहीत, अशी टिप्पणीदेखील त्यांनी यावेळी केली.