शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Karnataka Election 2023: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात, सुदैवाने सर्वजण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:01 IST

Karnataka Elections: एक पक्षी डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरची काच फोडून आत घुसला.

Karnataka Elections: सध्या कर्नाटक राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी दुपारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या कॉकपिट खिडकीवर घार आदळल्याने हा अपघात झाला आहे. 

शिवकुमार यांचे ट्विटडीके शिवकुमार कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे जाहीर सभेसाठी जात होते. या घटनेनंतर शिवकुमार यांनी ट्विटरवरुन घटनेची माहिती दिली. 'मुलबागलला जात असताना आमच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यात आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. सर्व लोकांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मी सुरक्षित आहे. इमर्जन्सी लँडिंगसाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकाचे आभार मानतो. आता रस्त्याने मुलबागलला जात आहे', असे ट्विट त्यांनी केले.

घारीची हेलिकॉप्टरशी टक्कर शिवकुमार यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने बंगळुरुच्या जक्कूर विमानतळावरुन उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर हवेत असताना एक घार त्यांच्यावर आदळली. यामुळे कॉकपिटची काचही फुटली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. शिवकुमार आणि पायलट यांच्यासोबत कन्नड वृत्तवाहिनीचा एक रिपोर्टर होता, जो हेलिकॉप्टरमध्ये त्यांची मुलाखत घेत होता. शिवकुमार यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत.

कर्नाटक निवडणूककर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटक निवडणुकीत 2,613 उमेदवारांपैकी 2,427 पुरुष, 184 महिला आणि 2 इतर आहेत. भाजपकडून 224, काँग्रेसकडून 223 (सर्वोदय कर्नाटक पक्षाच्या पाठिंब्याने), जेडीएसचे 207, आम आदमी पार्टीचे 209, बसपचे 133, सीपीआय(एम), 8 जेडीयू आणि 2 एनपीपीचे उमेदवार आहेत. याव्यतिरिक्त, नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांचे (RUPP) 685 उमेदवार आणि 918 अपक्ष उमेदवार आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसAccidentअपघातHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना