शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:51 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सैय्यदचा संबंध नव्याने स्थापन झालेल्या ‘जमात उल मोमिनात’ या संघटनेशी असून, ही संघटना प्रतिबंधित ‘जैश-ए-मोहम्मद’ने गेल्या महिन्यातच सक्रिय केली आहे.

फरीदाबाद येथे मोठे अंतरराज्यीय दहशतवादी माड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर, अटक करण्यात आललेल्या आठ जणांपैकी लखनौ येथील एका महिला डॉक्टरसंदर्भात पोलिसांनी मोठा दावा केला आहे, डॉक्टर शाहीन सैय्यदने महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी लग्न केले होते. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकली नाही आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2006-07 मध्ये तिची निवड उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत कानपूर येथील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून झाली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सैय्यदचा संबंध नव्याने स्थापन झालेल्या ‘जमात उल मोमिनात’ या संघटनेशी असून, ही संघटना प्रतिबंधित ‘जैश-ए-मोहम्मद’ने गेल्या महिन्यातच सक्रिय केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सैय्यद पाकिस्तानस्थित हँडलरच्या संपर्कात होती. या हँडलरकडून भारतातील महिलांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्याचे निर्देश दिले जात होते. 

महत्वाचे म्हणजे, शाहीनला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या महिला भर्ती विंगचा भाग बनविण्यात आले असा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. घटस्फोटानंतर शाहीन हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली आणि तेथेच एकटी राहत होती. याचाच फायदा घेऊन तिला कट्टरतावादी बनवण्यात आले. नावी दिल्लीतील कार ब्लास्ट प्रकरणातही शाहीनला आरोपीत करण्यात आले आहे.

अधिक चौकशीसाठी तिला श्रीनगर येथे हलविण्यात आले आहे. चौकशीतून आणखी धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावरून, स्पष्ट होते की, ‘जैश-ए-मोहम्मद’ आता आयएसआय आणि आयएसआयएस प्रमाणेच महिलांच्या सहभागावर काम करत आहे. यात युद्ध आणि फिदायीन हल्ल्यांसाठीही महिलांचा वापर केला जाऊ शकतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Divorced, Professor, then Terrorist: Dr. Shaheen's Jaish-e-Mohammed Recruitment Role

Web Summary : Dr. Shaheen, once a professor, was arrested for alleged ties to Jaish-e-Mohammed. She recruited women for terrorist activities after her divorce. Investigations revealed her contact with a Pakistani handler. She is also implicated in a Delhi car blast case.
टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीBlastस्फोटPoliceपोलिस