प्रभाग-८-गोरेवाडा-३
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:42+5:302015-02-15T22:36:42+5:30
बॉक्स...

प्रभाग-८-गोरेवाडा-३
ब क्स...उद्यान व खेळाच्या मैदानाची वानवा गोरेवाडा प्रभागात एकही खेळाचे मैदान नाही, त्यामुळे लहान मुलांनी कुठे खेळावे हा प्रश्न आहे. फिरायला जाता यावे, असे एकही उद्यान नाही. येथील लोकांना सकाळी किंवा सायंकाळी सेमिनरी हिल्स येथील बालोद्यानात फिरायला जावे लागते. मुलांच्या खेळण्यासाठी मैदानाची अत्यंत आवश्यकता आहे, त्यामुळे प्रभागात मोकळ्या जागेवर मैदान का निर्माण केले जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. बॉक्स.. बोरगाव व मंजिदाना कॉलनीत सापांची भीती गोरेवाडा रिंगरोड ते गिट्टीखदानमधील मंजिदाना कॉलनी या दरम्यान संरक्षण विभागाची जागा आहे. झाडे लावून येथे जंगल तयार करण्यात आले आहे. जा जंगलाचा परिसर अगदी जुनी बोरगाव वस्ती आणि मंजिदाना कॉलनीला लागून आहे. त्यामुळे जंगलातील साप नेहमीच वस्तीत शिरतात. जंगलाच्या काठांनी राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच सापांची भीती असते. नागरिकांच्या प्रतिक्रिया वस्ती वाढली, रस्ता नाही - अनिल झोडापे गोरेवाडा वस्ती आता खूप वाढली आहे. अनेक ले-आऊट निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची संख्या वाढून वाहतूकही वाढलेली आहे. परंतु गोरेवाडा वस्तीतून जाणारा रस्ता मात्र होता तसाच आहे. वाढलेल्या ट्रिॅफकमुळे रस्ता आता कमी पडू लागला आहे. त्यामुळे वस्तीतील मुख्य रस्त्यांचेही रुंदीकरण करण्यात यावे. पैसे दिले तेव्हाच सफाई - राजेश यादव प्रभागात साफसफाई करणारे कर्मचारी येतात. परंतु पाहिजे तशी सफाई होत नाही. घरासमोर, दुकानासमोर पडलेला कचरा उचलला जात नाही. चहापाण्यासाठी पैसे मागितले जातात. जो पैसे देईल, त्याच्याच घरासमोरचा कचरा उचलला जातो, हा प्रकार कुठेतरी बंद झाला पाहिजे. पथदिवे नसल्याने महिलांना भीती - हंसराज बन्सोड गोरेवाडा येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. अनेक दिवसांपासून याकडे कुणाचेच लक्ष नाही. गोरेवाडा हा भाग तसा जंगलाला लागून आहे. त्यामुळे पथदिवे नसल्याने रात्री महिलांना भीती असते. भीतीमुळे रात्री महिला बाहेरच पडत नाही. असामाजिक तत्त्व याचा फायदा घेतात. गोरेवाडा रोडवर लुटण्याचे प्रकारही त्यामुळेच वाढले आहेत. स्मशानभूमीचा विकास व्हावा - संजय काळबांडे गोरेवाडा येथील स्मशानभूमी ही अतिशय जुनी आहे. परंतु ती आहे तशीच आहे. या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही सुविधा नसल्याने वस्ती एखाद्याचा मृत्यू झाल्यास मानकापूर घाटावर अंत्ययात्रा न्यावी लागते. त्यामुळे येथील स्मशानभूमीचा विकास तातडीने व्हावा.