शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग-८- गोरेवाडा-२

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

बॉक्स...

बॉक्स...
सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे
प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. रस्त्याच्या कडेलाच लोक कचरा फेकतात. दररोज कचरा उचलला जात नसल्याने तो इतरत्र पसरतो. त्यामुळे घाण होते. गोरेवाडा वस्तीमध्ये गाई-म्हशीचे गोठे असल्याने शेणाचे ढिगारेसुद्धा जागोजागी आहेत. त्यासोबतच बोरगाव बौद्धविहार, दिनशॉ फॅक्टरीजवळ कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतात.
बॉक्स..
पाण्याच्या पाईपलाईनमुळे
मंजूर सिमेंट रोडचे काम रखडले

गोरेवाडा परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ प्रकल्प येथे सुरू आहेत. संपूर्ण शहराला येथूनच पाणीपुरवठा केला जातो. येथील पाणी शहरातील वेगवेगळ्या मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि तेथील शहरभरात पाणी वितरित केले जाते. त्यासाठी येथून मोठ्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईन गोरेवाडा ते गिट्टीखदानदरम्यान असलेल्या रस्त्याला लागून गेल्या आहेत. गिट्टीखदान ते गोरेवाडा या रोडचे सिमेंटीकरण करण्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. तीन कोटी रुपयांमधून या रस्त्यांचे सिमेंटीकरण होणार होते. परंतु पाण्याची पाईपलाईन भलीमोठी असल्याने सिमेंटचा रस्ता रखडला आहे. पाईपलाईन काढण्याच्या कामासाठीच नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या तरी या रस्त्याचे सिमेंटीकरण रखडले आहे.
बॉक्स..
रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे वाहनचालकांना त्रास

गिट्टीखदान ते गोरेवाडा या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच लहान रस्ता आता चांगलाच रुंद झाला आहे. परंतु रस्ता रुंदीकरणात जुने विद्युत खांब ऐन रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे.
बॉक्स..
पथदिवे बंद
गिट्टीखदान ते गोरेवाडा रोड आणि मानकापूर ते काटोल रोड नाकादरम्यानचा रिंगरोड यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होतो. गोरेवाडा रिंगरोड आधीच अपघातांसाठी कुख्यात आहे. येथे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना येथील पथदिवे बंद असूनही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.