बोअरवेलरमध्ये अडकलेल्या चिमुकलीला 10 दिवसांनंतर बाहेर काढले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 19:20 IST2025-01-01T19:19:38+5:302025-01-01T19:20:55+5:30
Kotputli Borwell News: तीन वर्षीय चिमुकली 23 डिसेंबर रोजी खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडली होती.

बोअरवेलरमध्ये अडकलेल्या चिमुकलीला 10 दिवसांनंतर बाहेर काढले, पण...
Rajasthan Kotputli Borwell Update: राजस्थानच्या कोटपुतलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहा दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षीय मुलीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला आज यश आले. चेतना नावाच्या चिमुकलीला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासून चेतनाला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय चेतना 23 डिसेंबर रोजी खेळता-खेळता 700 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली होती. सुदैवाने ती 170 फूट अंतरावरच अडकली. तेव्हापासून प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक चिमुकलीची सुटका करण्यात गुंतले होते. 10 दिवस चाललेल्या बचाव मोहिमेनंतर आज अखेर चेतनाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले, मात्र तिचा जीव वाचवू शकले नाही.
बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, चेतना बोअरमध्ये एका खडकात अडकली होती. मुलगी जिथे अडकली होती, तिथून बोलवेल वाकली होती, त्यामुळे तिला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.