जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ टक्के पाऊस

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30

The district has only one percent annual rainfall | जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ टक्के पाऊस

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ टक्के पाऊस

>पुणे : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला असून वार्षिक सरासरी ८५३ मिलीमीटर असताना ४२९ मिलीमीटर पाऊस आजवर झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ६८ टक्के पाऊस झाला होता.
मावळ, भोर वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाची वाईट अवस्था आहे. पश्चिमेकडील तालुक्यांमध्येही पावसाची टक्केवारी चोपन्न ते पंचावन्न टक्के आहे. गेल्या वर्षी बारा ऑगस्टपर्यंत ८५३ मिलीमीटर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५८७ मिलिमीटर पाऊस होऊन त्याची टक्केवारी ६७ पर्यंत गेली होती.
विविध तालुक्यांत सरासरी होणारा पाऊस, जूनपासून आजपर्यंत झालेला पाऊ स व त्याची टक्केवारी अशी : आंबेगाव ८२८ /२६४/ ३१ बारामती ४२१/ ८९/ २१ भोर ९६०/ ७९५/ ८२ दौंड ३८२/ १२५ /३२ हवेली ५७०/ २१९/ ३८ इंदापूर ४३६/ ७२/ १६ जुन्नर ६८० /३७२/ ५४ खेड ६०७/ ३३७ / ५५ मावळ १२०७/ ९९८/ ८२ मुळशी १५८५ /९३५/ ५९ पुरंदर ४१९/ १२६/ २५ शिरुर ४५०/ १३८/ ३० वेल्हा २४७९/ ११०८/ ४४

Web Title: The district has only one percent annual rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.