जिओचा दिवाळी धमाका, 500 रुपयात 100 जीबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:11 IST2017-08-10T16:11:43+5:302017-08-10T16:11:54+5:30

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोस ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे.

District Diwali Explosion, 500 GB to 100 GB | जिओचा दिवाळी धमाका, 500 रुपयात 100 जीबी

जिओचा दिवाळी धमाका, 500 रुपयात 100 जीबी

नवी दिल्ली, दि. 10 - रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोस ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे. ही नवी ऑफर दिवाळीमध्ये ग्राहकांच्या सेवेत येणार असल्याचे वृत्त आहे. यानुसार कंपनी 500 रुपयांत 100 जीबी इंटरनेट डेटा देणार आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी होम ब्रॉडबँड सर्व्हिस JioFiber लाँन्च करणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 500 रुपयांत 100 जीबी डेटा मिळेल.
इतकेच नाही तर, या ऑफरमध्ये इंटरनेटचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. कंपनीच्या बोर्ड डायरेक्टर आणि मुकेश अंबांनी यांची मुलगी ईशा अंबानीने एक ट्विट करत माहिती दिली आहे. सुरुवातीला 100 शहरांमध्ये ही सर्व्हिस सुरु करण्यात येणार असल्याचंही ईशा अंबानीने म्हटलं आहे.


यापूर्वी इकोनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, दिवाळी दरम्यान रिलायन्स जिओची होम ब्रॉडबँड सर्व्हिस लाँन्च केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.

Web Title: District Diwali Explosion, 500 GB to 100 GB