शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:23 IST

Accident Case : हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी एक अनियंत्रित कार झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्य वाल्मिकीनगर लव-कुश घाट येथून कारने नवलपूरला जात होते. दरम्यान, हरडियाचाटीजवळील वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालानौरंगिया स्टेशन प्रभारी राजेश झा यांनी सांगितले की, रामबाबू चौधरी, मंटू साहनी, मंटूची मुलगी अर्चना (7) आणि बेबी (3) अशी मृतांची नावे आहेत. ते पुढे म्हणाले की, सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमींची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्नBiharबिहारDeathमृत्यूPoliceपोलिस