जिल्हाध्यक्षपदी नेम्मानीवार

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30

किनवट : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी गंगन्ना नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली़

Dismissal of District President | जिल्हाध्यक्षपदी नेम्मानीवार

जिल्हाध्यक्षपदी नेम्मानीवार

नवट : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी गंगन्ना नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
१५ फेब्रुवारी रोजी जिल्हाध्यक्ष डॉ़व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ जिल्हा कार्यकारिणी अशी - अध्यक्ष गंगन्ना नेम्मानीवार, उपाध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, जिल्हासचिव इंजि़ द़मा़रेड्डी, कोषाध्यक्ष इबारे, सहसचिव संभाजी शिंदे, मोरे व कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आले़ निवडीचे अनेकांनी स्वागत केले़

उपोषणाचा इशारा
किनवट : दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर करून संगनमताने गोकुंदा ग्रामपंचायतीने निधीचा अपहार केल्याने दोषींविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत १९ फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिलीप पाटील या कार्यकर्त्याने दिला आहे़
गोकंुदा ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गैरदलित वस्तीत खर्च केला़ गटविकास अधिकारी, अभियंता, विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी या चौखडींनी संगनमत करून निधीचा दूरुपयोग केला व अनुसूचित जातीच्या घटकातील लोकांना वंचित केले़ दलितवस्ती एकीकडे तर रस्ता गैरदलित वस्तीकडे केल्याने संबंधितावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवामुक्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बेमुदत उपोषणास बसत असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे़

Web Title: Dismissal of District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.