लोकसभेत बिर्लांविरुद्धच्या प्रस्तावावर चर्चा टळली; सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:24 IST2026-03-10T06:24:16+5:302026-03-10T06:24:51+5:30

सभापती सभागृहात भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी बिर्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी करीत, यासंबंधीच्या प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मात्र, यावर चर्चा किंवा मतदान होऊ शकले नाही. 

Discussion on motion against Birla adjourned in Lok Sabha; House adjourned for the day | लोकसभेत बिर्लांविरुद्धच्या प्रस्तावावर चर्चा टळली; सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेत बिर्लांविरुद्धच्या प्रस्तावावर चर्चा टळली; सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेला प्रस्ताव सोमवारी सभागृहात चर्चेसाठी येऊ शकला नाही. पश्चिम आशियातील घडामोडींवर चर्चेसाठी विरोधक अडून राहिल्याने, झालेल्या गोंधळाने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभापती सभागृहात भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी बिर्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी करीत, यासंबंधीच्या प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मात्र, यावर चर्चा किंवा मतदान होऊ शकले नाही. 

काँग्रेस सदस्यांना पीठासीन सभापतींनी सुनावले

पीठासीन सभापती जगदंबिका पाल यांनी काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद यांना सभापती बिर्ला यांच्या विरोधातील प्रस्तावावर आपली भूमिका मांडण्यास सांगितले. मात्र, जावेद काँग्रेस सदस्य राहुल गांधी व के.सी. वेणुगोपाल यांना बोलू द्यावे, अशी मागणी करीत राहिले. यावर सभापतींनी इतरांना बोलू द्या, अशी मागणी करू शकत नाहीत. हा कोणता नियम आहे? अशा शब्दांत सुनावले. संसदेच्या कामकाजात दिवसाकाठी ९ कोटी रुपये खर्च होतात. जनतेच्या पैशाचे हे नुकसान आहे, असे सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सुनावले. 

Web Title : लोकसभा में स्पीकर बिड़ला के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पर चर्चा स्थगित

Web Summary : पश्चिम एशिया पर हंगामे के बीच स्पीकर बिड़ला के खिलाफ विपक्ष का प्रस्ताव बाधित हुआ। कांग्रेस ने चर्चा की मांग की, जिसके कारण स्थगन हुआ। पक्षपात के आरोपों ने व्यवधान और बहस को बढ़ावा दिया।

Web Title : Opposition's No-Confidence Motion Against Speaker Birla Stalled in Parliament

Web Summary : Opposition's motion against Speaker Birla was stalled amidst uproar over West Asia. Congress demanded discussion, leading to adjournment. Accusations of bias fueled the disruption and further debate.