शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा, वादविवाद हा लोकशाहीचा आत्मा

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. चर्चा, वादविवाद हा संसदेचा आत्मा आहे. चर्चेसाठी संसदेखेरीज दुसरे अन्य मोठे व्यासपीठ असूच शकत नाही, असे सांगतानाच त्यांनी या अधिवेशनात चांगले विचार, चांगली चर्चा आणि नव्या कल्पना समोर येतील असा विश्वास व्यक्त केला.संसदेत चर्चा, वादविवादासह अन्य बाबीही असतात. देशाचे ते कार्यक्षेत्र ठरते, असे त्यांनी महिनाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली आहे. चर्चेसाठी सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे मी आनंदी आहे. संसदेकडून देशाची अपेक्षा असून जनतेच्या कसोटीला उतरण्यासाठी खासदार कोणतीही कसर सोडणार नाहीत, अशी मला आशा आहे. विरोधकांना असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा हवी आहे. आमची सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारतीय संविधानाबद्दल देशभरात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्र्थ्यांनी भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना वाचायला हवी. हळूहळू संविधान हे जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी म्हणाले. घटनेचा मसुदा लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्षही साजरे होण्याचा योगायोग साधला जाणे प्रेरणादायी आणि सुदैवाची बाब आहे. >> डॉ. आंबेडकरांना अभिवादननवी दिल्ली : देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या संकल्पना आणि मूल्ये जपत घटनाकारांना अभिमान वाटेल अशा भारताची निर्मिती करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना दिले. देशात पहिला घटनादिन साजरा होण्याच्या ऐतिहासिक प्रसंगामुळे आपल्याला राज्यघटनेबद्दल खूप काही जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. देशाला घटना देण्यासाठी ज्यांनी अथकपणे कार्य केले त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य योगदानाचे स्मरण केल्याखेरीज आपल्या राज्यघटनेचा उल्लेख पूर्णत्वास जाणार नाही. मी त्यांना अभिवादन करतो, असेही मोदींनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)