शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:34 IST

उद्योगांच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्राची वारंवार तुलना होते

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनवर नेण्याचा विश्वास मोदींनी अनेकदा व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं हे उद्दिष्ट गाठल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. मात्र अर्थव्यवस्थेचा गाडा केवळ मोजकीच राज्यं हाकणार का, हा खरा प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं सध्याचं चित्र पाहिल्यास एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राज्यं महसुली उत्पादनात मोठं योगदान देतात. उत्तर भारतातली अनेक राज्यं आकारानं मोठं असली, तरी त्यांच्याकडून फारसा महसूल केंद्राला मिळत नाही. केंद्रीय थेट कर संकलन विभागानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून देशाला तब्बल ६१ टक्के महसूल मिळतो. याचाच अर्थ उर्वरित सर्व राज्यांमधून देशाच्या तिजोरीत केवळ ३९ टक्के महसूल जातो. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक यांच्या पाठोपाठ तमिळनाडू आणि गुजरातमधून जमा होणारा कर धरल्यास पाच राज्यांमधून केंद्राला ७२ टक्के महसूल मिळतो. यामध्ये व्यक्तींनी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी भरलेल्या कराचा समावेश आहे. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत महाराष्ट्रानं १९,१७,९४४ कोटी रुपयांचा कर दिला. केंद्राला मिळणारा तब्बल ३७.८५ टक्के महसूल एकट्या महाराष्ट्रातून गेला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीनं देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा केला आहे. दिल्लीमधून केंद्राला ६,९३,२७५ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशभरातून केंद्राकडे जमा झालेल्या महसुलातील १३.६८ टक्के वाटा दिल्लीचा आहे. देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्यांच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या स्थानी आहे. कर्नाटकनं केंद्राला ४,९९,३१० कोटींचा महसूल दिला आहे. म्हणजेच देशाच्या एकूण महसुली उत्पन्नात कर्नाटकचा वाटा ९.८ टक्के इतका आहे.कर्नाटकपाठोपाठ तमिळनाडूकडूनही केंद्राला मोठा महसूल मिळतो. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत तमिळनाडूनं केंद्राला ३,३९,८३६ कोटी रुपयांचा महसूल करांमधून मिळाला आहे. देशाच्या तिजोरीत जमा झालेला ६.७ टक्के महसूल तमिळनाडूनं दिला आहे. महाराष्ट्रासोबत कायम तुलना होणारा गुजरात महसूलच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. गुजरातकडून गेल्या पाच वर्षांत केंद्राला २,३१,३५७ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हा आकडा ४.५६ टक्के इतका आहे. 

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीKarnatakकर्नाटक