शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:26 AM

'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही' असं वादग्रस्त विधान एका भाजपा नेत्याने केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही' असे वादग्रस्त विधान एका भाजपा नेत्याने केले आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना मध्य प्रदेशमधील भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी असे विधान केले आहे. 

भोपाळ - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही' असे वादग्रस्त विधान एका भाजपा नेत्याने केले आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना मध्य प्रदेशमधील भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी असे विधान केले आहे. 

दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्वीटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटले होते. या ट्वीटचा दाखला देत 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून जोवर ते मोबाईलवर बोटं चालवत नाही आणि तोंडातून भारताविरोधात विधान करत नाही, तोवर त्यांना जेवणच जात नाही' असे गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. 

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारकडे एअर स्टाईकचे पुरावे मागितले होते. यानंतर एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील संशय व्यक्त केला होता. 'पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,' असे दिग्विजय यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. 

'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की तीदेखील अपघात होती? असा प्रश्न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,' असे सिंह म्हणाले. राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्याने आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपाने दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे अडीच हजार जवान बसेसमधून श्रीनगर जात असताना दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या एका कारने धडक दिली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला हवाई दलाने मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक