शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Digital Currency Proposal: देशाची डिजिटल करन्सी येणार? आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 6:09 PM

RBI Proposal To Digital Currency In India Update: भारताची डिजिटल करन्सी हवी आणि नको असे दोन मतप्रवाह आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून यावर जोरदार बैठकांचे सत्र सुरु आहे. आज त्यावर पडदा पडला.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस खूप महत्वाचा ठरला. तीन कृषी कायदे जसे आले तसे ते रदद्ही झाले. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. या अधिवेशनात आणखी महत्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. जगभरात क्रिप्टोकरन्सीने धुमाकूळ घातला आहे. यामुळे भारताचीही क्रिप्टोकरन्सी असावी अशा बाजुचा एक मतप्रवाह आहे. गेल्या काही दिवसांत यावर मोठ्या स्तरावर व्यापक बैठका झाल्या आहेत. 

भारताची डिजिटल करन्सी हवी आणि नको असे दोन मतप्रवाह असताना आज आरबीआयने सोमवारी सकाळी अधिवेशन सुरु होण्याआधी देशात डिजिटल करन्सी लाँच करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावात बँक नोटची व्याप्ती वाढविण्याचे म्हटले आहे. केंद्रीय बँकेने चलनाला डिजिटल फॉर्ममध्ये स्वीकारण्याची शिफारस केली आहे. 

या प्रस्तावात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट 1934 (RBI Act 1934) मध्ये संशोधन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आरबीआय गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल करन्सी आणण्याच्या प्रयत्नात आहे. 

फायदे कोणते? (Digital Currency Benefits to India)आरबीआयच्या प्रस्तावामध्ये रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सी अस्तित्वात आली तर त्याचे होणारे फायदे सांगितले आहेत. यामुळे रोखीवर अवलंबित्व कमी होईल. व्यवहार पारदर्शीदेखील होतील. आणखी एक मोठा फायदा म्हणजे सरकारचा नोटा छापण्याचा जो खर्च आणि वेळ आहे तो देखील वाचणार आहे. 

पहिल्याच दिवशी बिटकॉईनवर चर्चासंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होताच क्रिप्टोकरन्सी विधेयकाबाबत चर्चा झाली. देशात बिटकॉईनद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अर्थ मंत्रालयाने लिखित उत्तर दिले आहे. भारत सरकार बिटकॉईनद्वारे होत असलेल्या व्यवहारांची माहिती गोळा करत नाही. तसेच बिटकॉईनला चलनाची मान्यता देण्याचा देखील कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकlok sabhaलोकसभाParliamentसंसदCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी