शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 16:07 IST

देशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र तुम्हाला काहीच फरक पडत नाही.

नवी दिल्ली- लोकसभेत सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेसचे संसदीय नेते अधीर रंजन चौधरी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला केला. यावेळी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. 

पंतप्रधान मोदी मोठे विक्रेतेकोळसा आणि 2 जी घोटाळ्यामध्ये तुमचं सरकार येऊन सहा वर्ष झाली तरी आजतागायत कोणालाही पकडता आलं नाही. आजपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेलच्या बाहेर कसे? त्यांना तुरुंगात का टाकत नाही? देशाचा कायदा मजबूत व्हावा आणि दोषींवर कडक कारवाई अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे विक्रेते आहेत. आम्ही आमचे प्रोडक्ट विकण्यास असमर्थ ठरलो तर दुसरीकडे भाजपाने त्यांच्याकडील खराब प्रोडक्टही चांगल्यारितीने विकण्यास यशस्वी ठरली. 

विवेकानंद यांच्याशी पंतप्रधानांची तुलना चुकीची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात सरकारच्या धोरणांची झलक दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तुमचे नाहीत तर आपल्या सर्वांचे आहेत. स्वामी विवेकानंद यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली तुलना चुकीची आहे. फक्त नरेंद्र नाव असल्याने समानता करु शकत नाही. मॉँ गंगा आणि खराब नाल्याची तुलना करु शकत नाही. यावरुन संसदेत गदारोळ निर्माण झाला. 

देशात पाणीसंकट आणि बिहारमध्ये बालमृत्यू त्याचं काहीच देणंघेणं नाहीदेशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र तुम्हाला काहीच फरक पडत नाही. नवीन खासदारांना विश्वास आहे की, आपल्याला काही करण्याची गरज नाही फक्त मोदी बाबावर विश्वास ठेवा ते सगळं करतील. मोदी नावाची पूजा केल्याने सर्व समस्या सुटतील असा विचार नव्या खासदारांचा आहे. 2008-09 मध्ये आर्थिक मंदी असतानाही देशाची जीडीपी दर 8 टक्क्यांहून जास्त होता. 

काँग्रेसचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न देशात परमाणू संशोधनाचा पाया नेहरुंच्या कार्यकाळात होमी भाभा यांच्या माध्यमातून रचला गेला. परमाणू परीक्षणासाठी आम्ही वाजपेयींचे कौतुक करतो तसेच रस्ते निर्माणातही त्यांचे योगदान आहे. जर तुम्ही आमच्या नेत्यांची नावं घेत नसाल तर तुमच्या सरकारवर आमचा विश्वास कसा असेल? पहिल्यांदा परमाणू देश आम्हाला वंचित मानत असे मात्र 2008 मध्ये आम्ही संसदेत परमाणू करार पारित केला. पंतप्रधान ज्या देशात जातील त्याठिकाणी त्यांचा सन्मान झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. मात्र देशाला मिसाइल सिस्टम काँग्रेसने दिलं त्याच्या बळावर आज तुम्ही पाकिस्तानला संपविण्याची भाषा करता हे विसरु नका 

जर काँग्रेसने देशात स्पेस आणि मिसाइल मिशनची सुरुवात केली नसती तर आज चांद्रयान अंतरिक्षमध्ये पाठविण्याचा विचार करु शकला असता का? देशात टेलिकॉम क्रांती आणण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकाळात झालं. जेव्हा टेलिकॉम क्रांतीची चर्चा होते तेव्हा राजीव गांधी यांचे नाव समोर येतं. जर राजीव गांधी नसते तर देशात टेलिकॉम क्षेत्र मजबूत झालं असतं का? असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांना केला. तसेच आता 5 जी चं युग आलं आहे. देशाच्या लोकांनी ही सुविधा मिळायला हवी. मनरेगा, आरटीआय, आरटीई, जमीन अधिग्रहण, खाद्य सुरक्षा असे महत्वाचे कायदे आणण्याचं काम काँग्रेसने केले. 

भाजपाची भूमिका दुटप्पीपणाची मोदींनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसच्या योजनांचे नाव बदलण्याचं काम फक्त केलं. बेरोजगारीच्या समस्येवर सरकारने अधिक लक्ष देणं गरजेचे आहे. पाकिस्तानविरोधात मजबूत नीती बनविणे गरजेचे आहे. एकीकडे तुमच्या पक्षाचे लोक गोडसेच्या बाजूने नारे देतात तर दुसरीकडे तुम्ही महात्मा गांधी जयंती साजरी करता असा टोला अधीर रंजन चौधरींनी मोदींना लगावला.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभा