पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 23:44 IST2025-05-08T23:42:51+5:302025-05-08T23:44:23+5:30
India Pakistan News Latest: पाकिस्तानी लष्कराने अचानक भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी मिसाईल, ड्रोन डागले. त्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे.

पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
India Pakistan News Latest Marathi: भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर पाकिस्तान ८ मे रोजी रात्री अचानक भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले भारतीय लष्कराने हवेत निष्क्रिय केले जात आहेत. दरम्यान, भारतीय पठाणकोट किंवा राजौरीत लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. भारतीय लष्कराकडून फेटाळण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानने जम्मू राजस्थानातील भारतीय लष्कराच्या तळांच्या दिशेने हवाई हल्ले केले. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानने डागलेल्या ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच निष्क्रिय केल्या. याच दरम्यान, एकीकडे पाकिस्तानी लष्कराने हल्ले सुरू केलेले असतानाच दहशतवाद्यांनीही आत्मघाती हल्ला केल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले.
याबद्दल भारतीय लष्कराने स्पष्टपणे सांगितले आहे की, पठाणकोट किंवा राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. अशी कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही.
News reports with respect to suicide attacks by terrorists at Pathankot or Rajouri are completely false: Army officials pic.twitter.com/PpldlDUBJp
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानचे दोन JF 17, एक F 16 लढाऊ विमान पाडले
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई दलाच्या आणि लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न केला. पाकिस्तानने अचानक हवाई हल्ला चढवल्यानंतर भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर देण्यास सुरूवात केली. पाकिस्ताने डागलेल्या मिसाईल आणि ड्रोन हवेतच निष्क्रिय करण्यात आले.
🚨 पाकिस्तान ने जालंधर के पास CT College क्षेत्र में ड्रोन हमला किया, जिसे भारतीय सेना ने बहादुरी से मार गिराया ।
जय हिंद! 🇮🇳#IndiaPakistanWarpic.twitter.com/hYp8n0hCFo— ashokdanoda (@ashokdanoda) May 8, 2025
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे दोन जेएफ १७ आणि एक एफ १६ ही लढाऊ विमाने भारतीय लष्कराने टिपली. तिन्ही लढाऊ विमाने पाडण्यात आली असून, पाकिस्तान लष्करासाठी महत्त्वाचा धक्का आहे. भारताच्या एस ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानने डागलेल्या ८ मिसाईलही हवेतच नष्ट केल्या.