शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:46 AM

जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी जखमी झालेल्यांनीच हा हिंसाचार घडवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी जखमी झालेल्यांनीच हा हिंसाचार घडवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. हा हल्ला घडविणाऱ्या नऊ संशयित हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यातील सात जण एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ, डीएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आहेत. या संशयितांत जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष व काही माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित हल्लेखोरांच्या छायाचित्रांचे पोस्टरही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.या संशयितांमध्ये आयशी घोष, चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, सुचेता तालुकदार, प्रिया रंजन, विकास पटेल, दोलान सावन, योगेंद्र भारद्वाज आदींचा समावेश आहे. त्यापैकी योगेंद्र भारद्वाज हा युनिटी अगेन्स्ट लेफ्ट या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार घडविण्यासाठी या ग्रुपचा वापर करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.एसएफआय, एआयएसएफ, डीएफआयच्या कार्यकर्त्यांनी जेएनयूच्या सर्व्हरची नासधूस केली. त्यामुळे सेमिस्टरची नोंदणी बंद पडली. बहुसंख्य विद्यार्थी नोंदणीस तयार होते पण त्यांनी सहकार्य करू नये अशी भूमिका या विद्यार्थी संघटनांनी घेतली. चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठातील सर्व्हर रुम व तेथील काचेचे दरवाजे फोडले, असे पोलिसांनी सांगितले. पेरियार हॉस्टेलच्या विशिष्ट खोल्यांतील विद्यार्थ्यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. हे बहुतांश विद्यार्थी अभाविपचे कार्यकर्ते होते. या हल्ल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मात्र या संशयितांना चौकशीसाठी पोलीस बोलाविणार आहेत.

आयशी घोषचे आव्हानमाझ्याविरोधात असलेले सर्व पुरावे पोलिसांनी सर्वांसमोर ठेवावेत अशी मागणी दिल्ली पोलिसांनी संशयित हल्लेखोर ठरविलेल्या आयशी घोष यांनी केली आहे. त्या जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आहेत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नाही. दिल्ली पोलीस पक्षपातीपणे वागत आहेत, सनदशीर मार्गाने आमचा लढा सुरूच राहिल असेही त्यांनी सांगितले.फीवाढ होणारच : कुलगुरूफीवाढीसंदर्भात घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी भूमिका कुलगुरू एम. जगदीशकुमार यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी झालेल्या त्बैठकीत घेतली. फीवाढ रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणत असलेल्या दबावापुढे न झुकण्याचा पवित्रा कुलगुरुंनी घेतला आहे. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे व शैक्षणिक सत्र सुरू करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
पुरावे जपून ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाजेएनयूमध्ये गुंडांनी विद्यार्थी, शिक्षकांना केलेल्या बेदम मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे नीट जपून ठेवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने द्यावेत अशी विनंती करणारी याचिका शुक्रवारी या विद्यापीठातील तीन प्राध्यापकांनी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज, युनिटी अगेन्स्ट लेफ्ट, फ्रेंड्स आॅफ आरएसएस या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चर्चेची माहिती, मारहाणीची छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप, या ग्रुपच्या सदस्यांचे फोन क्रमांक ही माहिती पुरावा म्हणून जपून ठेवावी असा आदेश सरकारला द्यावा असे या याचिकेत म्हटले आहे. ही याचिका जेएनयूमधील अमित परमेश्वरन, अतुल सूद, शुक्ला विनायक सावंत या प्राध्यापकांनी केली आहे.>मनुष्यबळ विकासमंत्र्यांवर पक्षश्रेष्ठी नाराजजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) सध्याची परिस्थिती लवकरात लवकर निवळावी, अशी मोदी सरकारची इच्छा आहे. संबंधित अधिकाºयांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्यातून ती आणखीनच बिघडली व पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच नाराज झाले. त्यांच्या नाराजीनंतरच मनुष्यबळ विकास मंत्रालय सक्रिय झाले व त्याने विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना बोलावून ते कुठे कसे कसे चुकले याची चांगली समज त्यांना दिली. भाजपने अभाविपला डाव्यांच्या निदर्शनांना निदर्शनांनी प्रतिउत्तर देऊ नका, असे सांगितले आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधातील (सीएए) प्रकाशझोत जेएनयुतील घटनांवर गेल्याबद्दल पक्षाचे नेतृत्व नाराज आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल-निशंक यांनी ज्या पद्धतीने जेएनयूतील घटना हाताळल्या तेही कारण पक्ष श्रेष्ठींच्या नाराजीचे आहे. त्यानंतर जगदीश कुमार व निशंक यांच्यात काही बैठका झाल्या.

टॅग्स :jnu attackजेएनयू