जुळ्या भावंडांना त्यांच्या चेहऱ्यातील साधर्म्यामुळे ओळखण्यात गडबड झाल्याने अनेक गमतीजमती घडतात. मात्र एकसारखं दिसण्याचा फायदा घेऊन दोन भावांनी मोठा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील फेज-१ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करून ४ जणांना अटक केली आहे. या टोळीचे मास्टरमाईंड एकसारखे दिसणारे दोघे जुळे भाऊ असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पकडण्यात आलेल्या दोन्ही भावांचे चेहरे एकसारखे होते. त्याचाच गैरफायदा घेऊन ते मोठ्या शिताफीने चोरीच्या घटना पूर्णत्वास न्यायचे. एवढंच नाही तर त्यांच्या चेहरेपट्टीतील साधर्म्यामुळे पोलीसही चकवा खायचे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या १५ दुचाकींसह वाहनांचे स्पेअर पार्ट्स मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यातील मुख्य आरोपी असलेले अरमान उर्फ सुट्टा आणि उलमान हे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकसारखे कपडे परिधान करून अदला-बदली करायचे. त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण व्हायचं . या दोघांपैकी एकजण कुणाला संशय येऊ नये म्हणून दुकानात बसून राहायचा तर दुसरा धूम-३ स्टाईलमध्ये चोरी करायचा.
या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सेक्टर-१४ए जवळून दोन जुळ्या भावांसह ४ आरोपींना अटक केली आहे. शादाब उर्फ रुतबा, अरमान उर्फ सुट्टा, उलमान आणि विजय अशी या चार आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ चोरलेल्या दुचाकी, १२ दुचाकींच्या टाक्या, ५ सायलेन्सर, ४ मडगार्ड आणि २ टायर रीम जप्त केले आहेत.
Web Summary : Twin brothers in Noida used their identical looks to commit thefts, with one acting as a decoy while the other stole. Police arrested them and two accomplices, recovering stolen bikes and parts worth ₹15 lakh.
Web Summary : नोएडा में जुड़वां भाइयों ने एक जैसे चेहरे का फायदा उठाकर चोरी की। एक भाई दुकान पर बैठता, दूसरा चोरी करता था। पुलिस ने उन्हें और दो साथियों को गिरफ्तार कर ₹15 लाख की बाइकें बरामद कीं।