शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पराभवानंतर धोनीच्या चाहत्यांनी उडवली पुण्याच्या मालकांची खिल्ली

By admin | Updated: May 22, 2017 19:07 IST

रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा संघ रोमहर्षक झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अवघ्या एका धावेने पराभव झाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अवघ्या एका धावेने पराभव झाला. यासोबतच पहिल्यांदा आयपीएल जिंकण्याचं पुण्याचं स्वप्न भंगलं. पराभवामुळे पुण्याचे चाहते चांगलेच निराश झाले पण यावेळी आयपीएलच्या सुरूवातीला आणि अंतिम सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीवर टीका करणा-या पुण्याच्या मालक बंधूंवर चाहत्यांनी निशाणा साधला. हर्ष गोयंका आणि संजीव गोयंकावर चाहत्यांनी तोंडसुख घेतलं.     
 
आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं,  स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.
 
त्यानंतर सुरूवातीच्या काही सामन्यानंतर हर्ष गोयंका यांनी पुन्हा धोनीविरोधी ट्विट केले होते. त्यांनी धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा फोटो ट्विट केला. यामध्ये अप्रत्यक्षपणे संघात धोनीचा सर्वात खराब स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी म्हटलं. ट्विटमध्ये जरी त्यांनी धोनीचं नाव घेतलं नसलं तरी हे ट्विट धोनीसाठीच होतं हे धोनीच्या चाहत्यांनी हेरलं आणि गोयंका यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला. आतापर्यंत मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे आणि डॅनियल ख्रिस्टियन यांचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी ट्वीट केलं. त्यासोबत त्यांनी आकडेवारीचा एक फोटो अपलोड केला. त्यामध्ये धोनी पाचव्या नंबरवर होता आणि केवळ 73 इतका त्याचा स्ट्राइक रेट होता. 
 
त्यानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी संजिव गोयंका यांनी हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना स्टिव्ह स्मिथ हा महेंद्रसिंग धोनीच्या एक पाऊल पुढचा विचार करतो असं म्हटलं होतं. त्यामुळे चाहते चांगलेच नाराज होते, अखेर पुण्याच्या पराभवानंतर चाहत्यांनी पुण्याच्या मालकांवर टीकेची झोड उठवली. 
ट्विटरवर गोयंका बंधू झाले ट्रोल-