"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 22:27 IST2025-09-22T22:26:47+5:302025-09-22T22:27:19+5:30
इतर धर्माच्या लोकांनी आमच्या गरबा महोत्सवात सामील होऊ नये. प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावे, असा सल्लाही धीरेंद्र शास्त्री यांनी दिला आहे...

"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. याच बरोबर, बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे एक विधान सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. इतर धर्माच्या लोकांनी आमच्या गरबा महोत्सवात सामील होऊ नये. प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावे, असा सल्लाही धीरेंद्र शास्त्री यांनी दिला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या त्यांच्या मूळ गावी, गाडा येथे आहेत. रविवारी ते लवकूश नगर येथील बंबर बेनी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान प्रसारमाध्यमांनी त्यांना गरबा महोत्सवासंदर्भात प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कुणीही सनातनी विचारधारेचे लोक हज यात्रेला जात नाही. तर त्यांच्या लोकांनीही गरबा महोत्सवात येऊ नये.
या पुढे गरबा आयोजन समित्यांना सल्ला देताना, गरबा पंडपाच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवायला हवे, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. (अनेक कार्यक्रमांमध्ये शुद्धीचा भाग म्हणून लोकांवर गोमूत्र शिंपडले जाते...). धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे हे विधान सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यांचे समर्थक याला सनातन धर्माचे रक्षण मानून योग्य ठरवत आहेत. तर, विरोधक टीका करताना दिसत आहेत.
#DhirendraShastri#Navratri2025pic.twitter.com/1b7UVJ2ufA
— Khushbu Goyal (@kgoyal466) September 22, 2025
धीरेंद्र शास्त्री हे वेळोवेळी सनातन धर्म, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण मुद्द्यांवर बोलत असतात -
महत्वाचे म्हणजे, धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बऱ्याच दिवसांपासून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करत आहेत. या मागणीसाठी त्यांनी पदयात्राही काढली आहे. ते वेळोवेळी सनातन धर्म, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांसारख्या मुद्द्यांवरून आपली मते स्पष्टपणे मांडत आले आहेत.