सनातन धर्माचा ध्वज फडकवणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री आगामी एक महिना जगाच्या संपर्कापासून पूर्णपणे दूर जाणार आहेत. या काळात ते कुणाच्याही संपर्कात राहणार नाहीत. त्यांच्या धामवरही नसतील, कथाही सांगणार नाहीत आणि दिव्य दरबारही भरवणार नाहीत. एवढेच नाही तर, ते मोबाईल, टीव्ही आणि मुलाखतींपासूनही पूर्णपणे दूर राहतील.
कुठे जाणार आणि काय करणार?धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मे महिन्यात मध्य प्रदेश आणि बागेश्वर धाम सोडून उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामच्या डोंगरांमध्ये जाणार आहेत. ते तेथे एकांतवासात राहून साधना करतील. या साधनेदरम्यान त्यांचा कुणाशीही संपर्क असणार नाही.
काय म्हणाले धिरेंद्र शास्त्री? -या निर्णयासंदर्भात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "गुरूंच्या आज्ञे प्रमाणे आपण एक महिन्यासाठी बद्रीनाथच्या डोंगरात तपश्चर्येसाठी जात आहोत. सध्या ज्या वळणावर आपण उभे आहोत, तेथे स्वतःला साधणे अत्यंत आवश्यक आहे. वाटेत भरकटवणारे अनेक प्रसंग येतात. अनेक जण भेटतात, अशा वेळी स्वतःचे तप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मोबाईल, टीव्ही, कथा आणि भेटीगाठी अशा सर्व गोष्टी बाजूला ठेऊन आपण २१ दिवसांच्या साधनेसाठी जात आहोत." एवढेच नाही तर, "तेथून जेव्हा परत येऊ, तेव्हा नवी ऊर्जा, नवे विचार आणि नव्या तयारीसह जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होऊ", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Bageshwar Dham's Dhirendra Krishna Shastri is retreating for a month, disconnecting from the world. He will meditate in Badrinath, abstaining from कथा, दरबार, phone, and TV, seeking renewed energy to serve the public.
Web Summary : बागेश्वर धाम के धीरेंद्र कृष्ण शास्त्री एक महीने के लिए दुनिया से दूर हो रहे हैं। वह बद्रीनाथ में कथा, दरबार, फोन और टीवी से दूर रहकर ध्यान करेंगे, ताकि जनता की सेवा के लिए नई ऊर्जा प्राप्त कर सकें।