शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोटांचा डोंगर सापडल्यानंतर धीरज साहू मोठ्या अडचणीत; आता काँग्रेसनंही आपल्या नेत्यावर उपस्थित केला सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 01:26 IST

महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे.

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने बुधवार छापे टाकले. ओडिशा आणि झारखंडमध्ये टाकण्यात आलेल्या या छाप्यात आयकर विभागाने 300 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचा दावा केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे.

यासंदर्भात ट्विट करत काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "खासदार धीरज साहू यांच्या बिझनेससोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही घेणे-देणे नाही. केवळ तेच सांगू शकतात आणि त्यांनी हे स्पष्टही करायला हवे, की आयकर अधिकाऱ्यांकडून, त्यांच्या ठिकानांवरून एवढी मोठी रक्कम कशी जप्त केली जात आहे."

रोख मिळाल्यापासून राजकारण सुरू - खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर एवढी प्रचंड रोकड सापडल्यानंतर, राजकारण सुरू झाले आहे. यानंतर, ही जप्त केलेली रोकड काँग्रेस नेत्यांची असल्याचे झारखंडमधील भाजप नेते म्हणत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते ही रक्कम भाजप नेत्यांची असल्याचे म्हणत आहेत. 

यासंदर्भात बोलताना, भाजप खासदार संजय सेठ म्हणाले, आतापर्यंत 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पैसे मोजले जात आहेत, मशीन्स खराब होत आहेत. मात्र, पैसा संपत नाही. याचवेळी, प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, हा पैसा कुठून आला? हे मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना विचारू इच्छितो. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. हा चांगला पैसा नाही, तर हा काळा पैसा आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयcongressकाँग्रेसMember of parliamentखासदारBJPभाजपाJharkhandझारखंडOdishaओदिशा