शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धर्म जागरण मंचाची डेडलाइन, म्हणे २०२१ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवू

By admin | Updated: December 18, 2014 18:43 IST

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात राहणा-या सर्वांना हिंदू बनवू असे वादग्रस्त विधान धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ -  वाढत्या विरोधानंतर धर्म जागरण मंचाने  'घर वापसी'चा कार्यक्रम स्थगित केला असला तरी मंचाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समुदायाला भारतात राहण्याचा हक्कच नाही असे विधान मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले असून यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 
धर्मांतराच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेत विरोधकांनी सरकारची कोंडी केली असून वाढत्या विरोधामुळे धर्म जागरण मंचाला मुस्लिमांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम स्थगितही करावा लागला. मात्र या धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. ख्रिश्नन आणि मुसलमानांना संपवून ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भारताला हिंदू राष्ट्र बनवू असा आमचा संकल्प असल्याचे राजेश्वर सिंह यांनी सांगितले. धर्म जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत संघटना आहे.  राजेश्वर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली तरी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे आज मोदींचे छायाचित्र असलेली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. मोदींनी आज या दिनानिमित्त राज्यसभेत उपस्थित राहून जातीयवादाच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. धर्मजागरण मंचाचे नेते जे बोलत आहे ते भाजपाने स्वीकारावे किंवा त्यांचा विरोध करावा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे. 
दरम्यान, धर्मांतराच्या मुद्यावरुन गुरुवारीदेखील संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत यावर मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून मोदी सरकारने मात्र विरोधकांसमोर नमते न घेण्याची कणखर भूमिका घेतली आहे.