स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:17 IST2021-08-15T20:13:44+5:302021-08-15T20:17:36+5:30
धनबादमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देताना काँग्रेस नेत्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे.

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
कुणाला कुठं आणि केव्हा मृत्यू येईल याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार झारखंडच्या धनबादमध्ये समोर आला आहे. धनबादमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देताना काँग्रेस नेत्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. अन्वर हुसैन हे काँग्रेस पक्षाचे चिरकुंडा नगरचे मंडळ अध्यक्ष होते. ते चिरकुंडा चौकातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना अन्वर हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले. रुग्णालयात येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अन्वर हुसैन हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. दरवर्षी ते चिरकुंडा शहीद चौकातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहायचे. पण यावेळीचा स्वातंत्र्य दिन त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल असा कुणीच विचार केला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी हुसैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.