शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या पागल विकास विरोधात भाजपाचा बुलंद विकास, अशी सुरू झाली होती पागल विकासची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:33 IST

"विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या  "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

गांधीनगर - विधानसभा निवडणूक अवध्या काही महिन्यांवर आल्याने गुजरातमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच "विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या  "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या पागल विकासाविरोधात भाजपाने आपला बुलंद विकासचा नारा दिला आहे. "मी गुजरात आहे, मीच विकास आहे" या घोषणेसह गुजरात भाजपा काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरली आहे.सोशल मीडियामुळे 'विकास पागल हो गया है" हा नारा अल्पावधीच गुजरातमधून देशभरात पोहोचला. हा हॅशटॅग वापरून सरकारला सवाल विचारण्यात येऊ लागले. ज्या पागल विकासचा उल्लेख करून गुजरातमध्ये भाजपाला लक्ष्य केले जात आहे. त्या घोषणेची सुरुवात एका सर्वसामान्य नागरिकाने केलेल्या फेसबूक पोस्टवरून सुरु झाली होती. 20 वर्षांच्या सागर सावलिया नावाच्या तरुणाने फेसबूकवर गुजरातमधील सरकारी बस आणि तिचा तुटलेला टायर टाकून लिहिले होते की, "सरकारी बसगाड्या आमच्या आहेत, पण त्यातून प्रवास करताना सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे, जिथे आहात, तिथेच राहा कारण "विकास पागल हो गया है"त्यानंतर विकास पागल हो गया है हा हॅशटॅग आणि कॅप्शन वापरून लोक आपापल्या परिसरातील बकाल अवस्था सोशल मीडियावर शेअर करू लागले. त्यानंतर विकास कसा वेडा झालाय हे सांगण्याची सोशल मीडियावर लाटच आली. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेने भाजपाच्या विरोधकांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या घोषणांवर टीका करण्याची आयती संधीच दिली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांनीही या घोषणेचा पुरेपूर वापर करत मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.  विकासला काय झालं, असे राहुल गांधी यांनी विचारल्यावर उपस्थितांनी "गाडो थई छो" म्हणजेच तो वेडा झाला आहे, असे प्रत्युत्तर दिले. भाजपावर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनेही आपल्या मुखपत्रातून विकासाच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकास्र सोडले. दरम्यान, विकास पागल हो गया है ही घोषणा भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने विकासालाच केंद्र बनवले असून, गुजरातमधील विकास बुलंद झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी  मी आहे गुजरात, मी आहे विकास असा नारा देत विरोधकांच्या वेड्या विकासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujaratगुजरातIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी