विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:28 AM2020-11-12T00:28:34+5:302020-11-12T07:11:25+5:30

एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

Development is the basis of national politics | विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

Next

नवी दिल्ली : बिहार आणि अन्य पोटनिवडणुकीच्या निकालातून अगदी स्पष्ट झाले की, जनता आता विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच पाठिंबा देतील. २१ व्या शतकाातील राष्ट्रीय राजकारणाचा आधार विकास हाच असेल, अशी खूणगाठ जनतेनेबांधली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यातील पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल मतदार, कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अबोल मतदार असलेल्या देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिलांनी भाजपला पाठिंबा दिला. लोकशाहीमार्गाने भाजपशी मुकाबला न करु शकणाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचा मार्ग पत्करला. हत्येचा हा खेळ लोकशाहीत चालू शकत नाही. गरीब, दलित आणि वंचित घटक आपले प्रतिनिधीत्व म्हणून फक्त भाजपकडे पाहतात.

भाजपला समाजातील प्रत्येक घटकांच्या गरजांची जाणीव आहे. घराणेशाही असलेल्या राजकीय पक्षांचा लोकशाहीला मोठा धोका आहे. एक राष्ट्रीय पक्षही घराणेशाहीत अडकला. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच भाजपचा एकमेव मंत्र आहे. भाजपवर पुन्हा विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. तसेच निवडणुका शांततेत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोग, सुरक्षा दले आणि प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.
 

Web Title: Development is the basis of national politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.