शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा निर्धार; स्थापन करणार नवा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 09:39 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.

जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देणारजम्मू :  काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरच्या खोऱ्यात आणून त्यांचे पुर्नवसन करणे, नागरिकांच्या जमीन व नोकरीविषयक हक्कांचे रक्षण ही कामे आझाद  हाती घेणार आहेत. आझाद नवीन पक्ष स्थापन करणार असून, अद्याप त्याचे नाव ठरविलेले नाही. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी घेतलेली ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेत आझाद म्हणाले की, जनतेशी तसेच जन्मू-काश्मीरमधील नेत्यांशी चर्चा करून माझ्या नव्या पक्षाचे नाव ठरविणार आहे. हे नाव मौलानांच्या उर्दूमधील किंवा पंडिकांच्या संस्कृतमधील नसेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सभेत व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, काही माजी मंत्री, पीडीपीचे माजी आमदार सईद बशीर, अपनी पार्टीचे नेते शोएब नबी लोन आदी मान्यवर उपस्थित होते. 

काश्मीरची जनता ठरविणार पक्षाचे नाव -- गुलाम नबी आझाद म्हणाले की, माझ्या नव्या पक्षाबद्दल दिल्लीत बसून मी आदेश काढणार नाही. जम्मू-काश्मीरचे नेते व जनतेशी संवाद साधून मी नव्या पक्षाची ध्येयधोरणे व नाव नक्की करणार आहे. - माझ्या पक्षाचे नाव अतिशय सोपे असेल. जम्मू-काश्मीरच्या मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी लोकांनी आमच्या पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन गुलाम नबी आझाद यांनी केले.

‘बाहेरच्या लोकांना काश्मीरमध्ये नोकऱ्या देऊ नका’ -काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.

 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस