घरफोडी टोळ्यांच्या महिला सूत्रधाराचा शोध
By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:09+5:302015-09-04T22:46:09+5:30
घरफोडी टोळ्यांच्या महिला सूत्रधाराचा शोध

घरफोडी टोळ्यांच्या महिला सूत्रधाराचा शोध
घ फोडी टोळ्यांच्या महिला सूत्रधाराचा शोधअटक त्रिकुटाच्या चौकशीतून माहिती उघडमुंबई: माटुंगा, सायन ते घाटकोपर परिसरातील बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटणार्या टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचने आवळल्या. या टोळीची मुख्य सुत्रधार एक महिला असून टोळीजवळून चोरीचा २७ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.पंतनगर परिसरात राहणारी एक महिला लुटारुंना गुन्ह्यासाठी लागणारी गाडी, हत्यारे पुरवित असून गुन्ह्यातील किंमती ऐवज विक्री करण्यास मदत करत असल्याची माहिती एसीपी प्रफुल्ल भोसले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संजय गांधी नगर परिसरातून सतीश विष्णू बोराडे (२८), गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारा माटु मुझफर खत्री (२८) आणि रमेश कल्याणमल जैन ( ३५) याच्या घाटकोपर येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात यामागील मास्टरमाइंड महिलेचा सहभाग समोर आला. यामागील मास्टरमाइंड महिला चार ते पाच टोळयांची सुत्रधार असून तिचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लुटारुंकडे केलेल्या चौकशीत त्यांनी येथील अगरवाल नगर, जमदेशजी रोड, पाच उद्यान, माटुंगा या ठिकाणी साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आत्तापर्यंत तब्बल २७ लाख १६ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)