बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:41 IST2025-11-14T13:39:40+5:302025-11-14T13:41:03+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. जनतेने पक्षाला नाकारले, यामुळे आता या पक्षाला विरोधी पक्षात बसावेल लागणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष फक्त ३५ जागांवर आघाडीवर होते.

Despite defeat in Bihar, there is good news for RJD and Tejashwi Yadav | बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी

बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने पक्षाला नाकारले असून त्यांना आता विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. दुपारी १२:३० वाजेपर्यंत, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष फक्त ३२ जागांवर आघाडीवर होता. पण, हा पक्ष मतांच्या बाबतीत RJD पुढे आहे.

बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?

दुपारी १२.३० वाजेपर्यंत, भाजप ८५ जागांवर आघाडीवर होता, तर जेडीयू ७७ जागांवर आघाडीवर होता. चिराग पासवान यांचा एलजेपीही २० जागांवर विजयाच्या मार्गावर होता. यामुळे आरजेडीला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी किमान पाच वर्षे वाट पहावी लागेल हे निश्चित झाले. आरजेडीने फक्त ३२ जागांवर आघाडी घेतली होती, तर काँग्रेसने फक्त सात जागांवर आघाडी घेतली होती. सीपीआय आणखी सात जागांवर विजय मिळवू शकते.

आरजेडीचा पराभव झाला असला तरी मतांच्या टक्केवारीमध्ये आरजेडी सर्वात पुढे आहे. या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. दुपारी १२:३० वाजेपर्यंत मोजलेल्या मतांच्या आधारे, आरजेडीला अंदाजे २३ टक्के मते मिळाली आहेत. जागांच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपला २१.३२ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, जेडीयूला १८.९२ टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला ८.१५ टक्के मते मिळाली आहेत.

Web Title : बिहार में हार के बाद भी, राजद और तेजस्वी यादव के लिए खुशखबरी

Web Summary : बिहार चुनावों में हार के बावजूद, तेजस्वी यादव की राजद को वोट शेयर में बढ़त मिली। केवल 32 सीटों के साथ, राजद ने लगभग 23% वोट हासिल किए, जबकि भाजपा को 21.32% मिले। भाजपा सीटों में आगे है, लेकिन राजद वोट प्रतिशत में सबसे बड़ी पार्टी है।

Web Title : RJD's Loss in Bihar, Yet Good News for Tejashwi Yadav

Web Summary : Despite the RJD's defeat in Bihar elections, with only 32 seats, Tejashwi Yadav's party leads in vote share, securing approximately 23% against BJP's 21.32%. While BJP leads in seats, RJD emerges as the largest party in terms of vote percentage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.