लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करता येईल हेअर कटिंग,अंकलने शोधून काढला अजब फंडा, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:32 IST2020-05-20T16:31:56+5:302020-05-20T16:32:17+5:30

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात लॉकडाऊन ...

desi uncle jugaad technique for haircut during Lockdown netizens loves It | लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करता येईल हेअर कटिंग,अंकलने शोधून काढला अजब फंडा, एकदा पाहाच

लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करता येईल हेअर कटिंग,अंकलने शोधून काढला अजब फंडा, एकदा पाहाच

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यांर्यंत अनेकांचे नवीन लूक व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये हेअर स्टाइल आणि दाढी वाढल्याने स्टाइल स्टेटमेंटची पुरती वाट लागल्याचे समोर येत आहे. अशात काहींनी घरीच स्वतःचा मेकओव्हर करण्यास सुरूवात केली आहे.

सलून, ब्युटीपार्लर बंदच असल्यामुळे दाढी, कटिंग घरीच करत वेळ मारून नेत असल्याचे अनेकजण पाहायला मिळत आहे.  घरीच हेअर कट करते वेळी काही चुक झाली तर मग थेट टक्कल करण्याचीही वेळ अनेकांवर आली आहे. तसेच सलून, ब्युटीपार्लर बंद असल्यामुळे अशात किती दिवस अशा अतरंगी लूकमध्ये राहणार यासाठी एका अंकलनेच अजब तोडगा शोधून काढला आहे.

घरीच राहून कशाप्रकारे हेअर कट करता येईल याविषयीचा हा व्हिडीओ आहे. अनेकांसाठी हा व्हिडीओ खूप फायदेशीरही ठरू शकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.व्हिडीओ पाहून अनेकांनी भरपूर लाईक्स आणि कमेंटस देत पसंती दिली आहे.  

Web Title: desi uncle jugaad technique for haircut during Lockdown netizens loves It