शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण; पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 18:37 IST

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आली समोर. गुरुग्राम येथील मेंदांता रुग्णालयात काढण्यात आलेला कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह.

ठळक मुद्देडेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आली समोर. गुरुग्राम येथील मेंदांता रुग्णालयात काढण्यात आलेला कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह.

बलात्काराच्या आरोपाखाली सुनारिया तुरूंगात असलेल्या डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला आता उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल आलं आहे. गुरमीत राम रहीम यानं पोटदुखीची तक्रार केली होती. यानंतर मेदांता रुग्णालयात गुरमीत राम रहीम याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

गुरमीत राम रहीम यानं पोटदुखीची तक्रार केल होती. त्यानंतर पीजीआय रोहतकमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या ठिकाणी त्याचं सिटी स्कॅन, एन्जिओग्राफी आणि फायब्रोस्कॅन करण्यात आलं. रोहतक पीजीआयनं त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला एम्स रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नाही. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं त्याला मेदांता रुग्णालात नेण्याचा सल्ला दिला.सुनारिया तुरुंगाचे सुप्रिटेंडंट सुनिल सांगवान यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरमीत राम रहीमवर पीजीआयमध्ये उपचार सुरू होती. परंतु त्याच्या काही चाचण्या करायच्या होत्या. त्या पीजीआयमध्ये उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्याला चाचणीसाठी गुरुग्राम येथे नेण्यात आलं. यापूर्वी ३ जून रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्याला पीजीआय रोहतकमध्ये आणण्यात आलं होतं. तपासणी केल्यानंर त्याला पुन्हा पाठवण्यात आलं. यापूर्वी १२ मे रोजीही गुरमीत राम रहीमला कोरोनाच्या शक्यतेवरून मोठ्या सुरक्षेच्यादरम्यान पीजीआय रोहतकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशGurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम