केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेवर देसरडा- भस्मे पॅनलचा विजय
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30
औरंगाबाद : केंद्रीय होमिओपॅथिक परिषद, नवी दिल्लीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून डॉ. देसरडा व डॉ. भस्मे पॅनलचा विजय झाला. महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या पाच जागांवर महाराष्ट्र अन्याय निवारण संघर्ष समितीच्या पॅनलने विजय मिळवला. ही निवडणूक चुरशीची ठरली. गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेल्या या निवडणुकीची आज मुंबईत मतमोजणी झाली. या निवडणुकीत तीन पॅनल व अपक्ष मिळून एकूण २९ उमेदवार रिंगणात होते. ३८ हजारांपैकी १८ हजार ३०० मतदान झाले. त्यापैकी दहा हजार मताधिक्य घेऊन संपूर्ण पॅनलने विजय मिळवला. डॉ. शांतीलाल देसरडा व डॉ. अरुण भस्मे हे तिसर्यांदा केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर निवडून गेले. या दोघांशिवाय डॉ. रवी भोसले, डॉ. दयानंद चौधरी व डॉ. शिवा भोसले यांचा या पॅनलमध्ये समावेश होता.

केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेवर देसरडा- भस्मे पॅनलचा विजय
औ ंगाबाद : केंद्रीय होमिओपॅथिक परिषद, नवी दिल्लीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून डॉ. देसरडा व डॉ. भस्मे पॅनलचा विजय झाला. महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या पाच जागांवर महाराष्ट्र अन्याय निवारण संघर्ष समितीच्या पॅनलने विजय मिळवला. ही निवडणूक चुरशीची ठरली. गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेल्या या निवडणुकीची आज मुंबईत मतमोजणी झाली. या निवडणुकीत तीन पॅनल व अपक्ष मिळून एकूण २९ उमेदवार रिंगणात होते. ३८ हजारांपैकी १८ हजार ३०० मतदान झाले. त्यापैकी दहा हजार मताधिक्य घेऊन संपूर्ण पॅनलने विजय मिळवला. डॉ. शांतीलाल देसरडा व डॉ. अरुण भस्मे हे तिसर्यांदा केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर निवडून गेले. या दोघांशिवाय डॉ. रवी भोसले, डॉ. दयानंद चौधरी व डॉ. शिवा भोसले यांचा या पॅनलमध्ये समावेश होता.