लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 06:23 IST2017-11-26T06:22:39+5:302017-11-26T06:23:55+5:30
हिंसक धमक्या देणे आणि कुणाला शारीरिक नुकसान पोहोचविण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, असे प्रकार लोकशाहीत स्वीकारार्ह नाहीत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावले
लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावले
नवी दिल्ली : हिंसक धमक्या देणे आणि कुणाला शारीरिक नुकसान पोहोचविण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, असे प्रकार लोकशाहीत स्वीकारार्ह नाहीत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
‘पद्मावती’ चित्रपटाचा उल्लेख न करता व्यंकय्या नायडू यांनी कायद्याचे उल्लंघन करू पाहणा-यांना इशारा दिला. एका साहित्य महोत्सवात व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही चित्रपटांवरून समस्या निर्माण झाली आहे. काही लोकांना असे वाटते की, त्यांचा धर्म आणि समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मात्र अशा आंदोलनाच्या काळात काही लोक अतिरेकच करतात आणि बक्षिसांच्या घोषणा करतात. या लोकांकडे एवढा पैसा आहे की नाही याबाबत मला संशय आहे. सर्वच जण एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करत आहेत. एक कोटी रुपये असणे सोपे आहे काय? मुळात लोकशाहीत हिंसाचाराला चिथावणी देणाºया धमक्यांना स्थानच असता कामा नये. लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
पद्मावती चित्रपटावरून वाद सुरूअसतानाच काही नेत्यांनी संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका
पदुकोन यांचा शिरच्छेद करणाºयास इनाम देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नायडू यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे. नायडू म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, तसेच दुसºयांच्या भावना दुखावण्याचाही अधिकार नाही.
आता ममतांना धमकी
संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोन यांचा शिरच्छेद करण्यासाठी इनाम घोषित केल्यानंतर भाजपा नेते सूरज पाल अमू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही धमकावले आहे.
बॅनर्जी यांनी भन्साळी व दीपिका यांना पाठिंबा दिल्यानंतर सूरज पाल अमू म्हणाले की, लक्ष्मणाने शूर्पणखेच्या बाबतीत काय केले होते ते ममता बॅनर्जी यांना सांगण्याची मला गरज वाटत नाही. लक्ष्मणाने शूर्पनखेचे नाक कापल्याचे संदर्भ रामायणात आहेत.