शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:19 IST

जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले.

 शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन अशा वेळी झाले जेव्हा काँग्रेस स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काँग्रेसमध्ये कामराज यांच्यानंतर तीन संकटमोचक होते ते म्हणजे प्रणव मुख़र्जी, जितेंद्र प्रसाद आणि अहमद पटेल. मुख़र्जी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षापासून दूर गेले. जितेंद्र प्रसाद यांचे आधीच निधन झाले तर आता फक्त पटेल राहिले होते.

जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले.  पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत अहमद पटेल यांनी सगळ्या आघाड्यांवर महत्वाची भूमिका पार पाडली. पक्षासमोर आता काही मोजकेच चेहरे आहेत जे पक्षाला संकटातून बाहेर काढू शकतील. या मोजक्या नेत्यांमध्ये ऐ. के. अँटोनी, पी. चिदंबरम, अशोक गेहलोत आणि ग़ुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. 

ॲंटोनी आजारी असून पक्षाला जेवढी  सक्रियता हवी तेवढी ते दाखवू शकत नाहीत. चिदंबरम यांचा  स्वभाव आणि भाषा ही अडचण  आहे. अशोक गेहलोत यांचे नाव पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण ते गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. ग़ुलाम नबी आझाद सध्या ग्रुप २३ चे सदस्य असून पक्ष नेतृत्वाची त्यांच्यावर नाराजी आहे.

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलcongressकाँग्रेस