शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
5
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
6
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
7
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
8
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
9
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
10
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
13
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
14
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
15
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
16
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
17
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
18
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
19
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
20
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
Daily Top 2Weekly Top 5

२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:24 IST

२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती.

चेन्नई - भाजपानं मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. बुधवारी रात्री एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. 

या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाला राज्यात एकूण २३४ जागांपैकी ५६ जागा हव्या आहेत. त्याशिवाय राज्यात सरकार बनल्यानंतर ३ मंत्रि‍पदांची मागणीही शाह यांनी केली आहे. या ५६ जागांमध्येच भाजपा त्यांच्या सहकारी मित्रांनाही सामावून घेईल. ज्यात एआयडिएमकेचे बंडखोर नेते ओ पन्नीरसेल्वम आणि टी.टी.वी दिनाकरन यांच्या नेतृत्वातील गट सहभागी आहे. त्याशिवाय तामिळनाडूत भाजपाचे काही छोटे सहकारीही आहेत. पुथिया तमिलगमसारखे पक्ष हे एनडीएचा भाग आहेत. 

२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. एनडीएत सहभागी असणाऱ्या पीएमकेला ५ जागा मिळाल्या होत्या. डिएमकेचा सहकारी पक्ष काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. एआयडिएमके पक्षातील सूत्रांनुसार, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी बैठकीत भाजपाला कुठलेही आश्वासन दिले नाही. पक्षात याबाबत सल्लामसलत करावी लागेल असं त्यांनी शाहा यांना म्हटलं. 

दरम्यान, निवडणुकीच्या दृष्टीने अशाप्रकारे जागांचे संकेत देणे हे हानिकारक ठरू शकते, कारण राज्यातील जनता ते स्वीकारणार नाही.  यामुळे अण्णा द्रमुकच्या विजयाचा अर्थ तामिळनाडूमध्ये भाजपाचे राज्य येईल असा विरोधकांचा दावा बळकट होईल असं एआयडिएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. दिवंगत अभिनेते-राजकारणी विजयकांत यांची डीएमडीके पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एआयडिएमकेला ही ऑफर दिली आहे. ९ जानेवारी रोजी होणारी डीएमडीकेची बैठक ही घोषणा करण्यासाठी योग्य वेळ मानली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shah's strategy: BJP demands 56 seats, 3 ministries in Tamil Nadu.

Web Summary : Amit Shah aims for 56 seats and 3 ministries for BJP in Tamil Nadu, potentially including allies. AIADMK hasn't committed, fearing it strengthens opposition claims of BJP dominance. DMDK might rejoin NDA.
टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूAmit Shahअमित शाह