स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी निवेदन : बौध्द समाजाचे साकडे
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30
चाकूर : तालुक्यातील लातूर रोड येथील बुद्ध आणि अन्य समाजासाठी स्मशानभूमी नाही़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जमिनीतील जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे करण्यात आली आहे़

स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी निवेदन : बौध्द समाजाचे साकडे
च कूर : तालुक्यातील लातूर रोड येथील बुद्ध आणि अन्य समाजासाठी स्मशानभूमी नाही़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जमिनीतील जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे करण्यात आली आहे़ लातूररोड येथील बौद्ध समाजाचे ४०० कुटुंब आहेत़ मात्र येथे कोणत्याही समाजासाठी स्मशानभूमी नाही़ त्यामुळे मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नाही़ १९५२ च्या कालावधीत निर्माण झालेल्या लातूररोड गावात विविध जाती-धर्माचे लोक राहतात़ परंतु, स्मशानभूमी नसल्याने मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कोठे करावे हा प्रश्न निर्माण होत आहे़अनेकदा येथे वादही निर्माण झाले़ त्यामुळे तालुका प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला़ तरीही त्याची दखल घेतली जात नाही़येथे जिल्हा परिषदेची ५२ एकर जमीन आहे़ त्यातील बरीच जमिन मोकळी आहे़ येथील जागा स्मशानभूमीसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ निवेदनावर दयानंद वाघमारे, दिलीप श्रृंगारे, अजय वाघमारे, ज्ञानोबा वाघमारे, श्रीहरी कांबळे, दगडू गायकवाड, बब्रुवान गायकवाड, किशोर मस्के, राहूल आचार्य आदींची नावे आहेत़