मागणी भरपूर..पुरवठा मर्यादित माशांचे दर भडकले

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:50+5:302014-05-09T18:10:50+5:30

Demand for a lot of goods | मागणी भरपूर..पुरवठा मर्यादित माशांचे दर भडकले

मागणी भरपूर..पुरवठा मर्यादित माशांचे दर भडकले

>* मच्छिीप्रेमी नाराज
आजरा :
आजरा शहर व परिसरात समुद्र व नदीच्या माशांना मोठी मागणी असली तरी माशांची आवकच कमी असल्याने माशांचे दर प्रचंड वाढले आहेत. यामुळे मच्छिपे्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
आजरा शहरांमध्ये वेंगुर्ला कारवार येथून समुद्री माशाची तर हिरण्यकेशी, घटप्रभा, चित्री नदीतून नदीच्या माशांची मोठ्या प्रमाणात आवक होते. कोकणचे प्रवेशद्वार म्हणून आजरा तालुका ओळखला होता. त्यामुळे वर्षभर येथे नदी व समुद्राचा मासा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. त्याचाच परिणाम म्हणून मच्छिप्रेमी नागरिकांची संख्या तालुक्यात प्रचंड आहे.
गेले दोन महिने मात्र वेंगुर्ला व कारवा येथून येणार्‍या माशांची आवक मंदावली आहे. मागणी कायम असल्याने उपलब्ध माशांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सुरमई, सरंगा, पापलेट, सौंदाळे या माशांचे प्रतिकिलो दर ४०० ते ५०० रूपयांपर्यंत गेले आहेत. ओले शिंगे (प्रॉन्स)ची अवस्थाही फारशी वेगळी नाही बाजारात बांगडे, तारळ्या यांचे दर फक्त बर्‍यापैकी आहेत. त्यामुळे इतर मासे बघण्यापुरतेच राहिले आहेत.
माशांची आवक आठवडा बाजारात ८ ते १० टनावरून दोन टनापर्यंत खाली आली आहे. याचा मोठा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झालेला आहे. हॉटेलमधून फिश थाळ्या गायब झालेल्या आहेत. पावसाळा संपेपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याीच शक्यता व्यापारी बोलून दाखवत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for a lot of goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.