राकेश किशोर वकिलाविरोधातील अवमान कारवाईची मागणी; याचिकेची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:35 IST2025-10-24T11:34:03+5:302025-10-24T11:35:02+5:30
सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. हे कृत्य करणाऱ्या वकील राकेश किशोर याचा परवाना तात्काळ स्थगित करण्यात आला.

राकेश किशोर वकिलाविरोधातील अवमान कारवाईची मागणी; याचिकेची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या रोखाने बूटफेकीचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर याच्या विरोधात न्यायालयीन अवमानाची कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी, २७ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ही याचिका सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) दाखल केली असून न्या. सूर्यकांत, न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर तिची सुनावणी होईल. तशी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिली आहे. सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न ६ ऑक्टोबर रोजी झाला. हे कृत्य करणाऱ्या वकील राकेश किशोर याचा परवाना तात्काळ स्थगित करण्यात आला. या प्रकाराकडे दुर्लक्ष करा, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली होती.
बूटफेकीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरन्यायाधीशांशी संवाद साधून या हल्ल्याचा निषेध केला होता.