क्रीडा संकुलात सामाजिक न्याय भवन बनवा रिपाइं (आ) च्या जिल्हाध्यक्षांची मागणी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:38+5:302015-02-14T23:51:38+5:30
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल या जागी न्याय भवन उभारावे, अशी मागणी रिपाइं (आ)चे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडा संकुलात सामाजिक न्याय भवन बनवा रिपाइं (आ) च्या जिल्हाध्यक्षांची मागणी
अ ोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल या जागी न्याय भवन उभारावे, अशी मागणी रिपाइं (आ)चे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नागदेवे म्हणाले, की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील दलित, मागासवर्गीय, आदिवासींचे सामाजिक तसेच आर्थिक प्रश्न सोडविण्याकरिता जिल्हानिहाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची निर्मिती केली आहे. अकोला जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील सरकारने निमवाडी, पोलीस लाइन येथील जागा न्याय भवनासाठी निश्चित केली आहे. प्रस्तावित सामाजिक न्याय भवन येथील जागेवर सामाजिक न्याय भवन निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी नाहरकत प्रमाणपत्र सादर केले आहे. सामाजिक न्याय विभागाने प्रस्तावित केलेली जागा अद्यापही गृह विभागाकडून सामाजिक न्याय विभागास हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे सदर बांधकाम प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील समाज बांधवांना सोईचे होईल, अशा ठिकाणी या भवनाची निर्मिती व्हायला हवी. क्रीडा संकुल हे शहराच्या मध्यभागी असल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल. रिपाइं (आ) च्या वतीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून क्रीडा संकुलाची जागा सामाजिक न्याय भवनासाठी मागण्यात येणार असल्याचे यावेळी नागदेवे यांनी सांगितले.--------------- रिपाइं (आ)चा विभागीय मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा विदर्भ प्रदेश कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा १८ फेबु्रवारी २०१५ रोजी सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये अविनाश महातेकर, उत्तम खोब्रागडे, पी. के. जैन, बाबूराव कदम, राजा सरवदे, देवेंद्र शेलेकर, एम. बी. तायडे, गौतम भालेराव, अशोक नागदेवे, गौतम सोनावणे, पुरण मेश्राम, एल. के. मडावी आदींची उपस्थिती राहणार आहे.