लावणी महोत्सव रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:18+5:302014-12-20T22:28:18+5:30
नांदेड : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना लावणी महोत्सवासारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावर शासकीय पैसे खर्च करणे योग्य नाही़ तेव्हा लावणी महोत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी किसान बिरादरीचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी केली आहे़

लावणी महोत्सव रद्द करण्याची मागणी
न ंदेड : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना लावणी महोत्सवासारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावर शासकीय पैसे खर्च करणे योग्य नाही़ तेव्हा लावणी महोत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी किसान बिरादरीचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी केली आहे़ माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने लोककला महोत्सव आयोजित करण्यात येत आहे़ याच कार्यक्रमात लावणी समाविष्ट केली असती तर चालले असते़ मात्र लावणी महोत्सव स्वतंत्ररित्या आयोजित करण्यात आला आहे़ त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून पैसे खर्च केले जाणार आहेत़ सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ अशावेळी लावणी महोत्सवावर अवास्तव खर्च करणे अनुषंगिक ठरणार नाही़ लावणी महोत्सव रद्द करुन समाजाप्रती असलेली संवेदना व्यक्त करावी़ ज्या पदाधिकारी, अधिकार्यांना लावणी ऐकण्याच हौस असेल अशा सर्वांनी स्वत:च्या खिशातून खर्च करुन लावणी महोत्सव ठेवावा़ लावणी महोत्सव रद्द न केल्यास किसान बिरादरी या सामाजिक संघटनेच्यावतीने तीव्र निदर्शने करण्याचा ईशारा देण्यात आला आहे़