त्र्यंबकेश्वर येथील आश्रमास शेड उभारण्याची मागणी
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:22+5:302015-03-06T23:07:22+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील महंत योगी चैतन्यनाथ गुरुपीर घन:शामनाथजी महाराज आश्रमात अद्याप शेडच दिले नसल्याने गेल्या १५ वर्षापासून आश्रम बिना शेडवाचून आहे. या शेडची मागणी येथील कोठारी महंत अश्विनीनाथ गुरु चेतननाथ हे गेल्या १२ वर्षापासून शेडची मागणी करीत आहे. त्यांना जागेच्या उतार्यासह अर्ज दिला आहे. पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.

त्र्यंबकेश्वर येथील आश्रमास शेड उभारण्याची मागणी
त र्यंबकेश्वर : येथील महंत योगी चैतन्यनाथ गुरुपीर घन:शामनाथजी महाराज आश्रमात अद्याप शेडच दिले नसल्याने गेल्या १५ वर्षापासून आश्रम बिना शेडवाचून आहे. या शेडची मागणी येथील कोठारी महंत अश्विनीनाथ गुरु चेतननाथ हे गेल्या १२ वर्षापासून शेडची मागणी करीत आहे. त्यांना जागेच्या उतार्यासह अर्ज दिला आहे. पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. गेल्या १५ ते १६ वर्षापासून येथे आश्रम अस्तित्वात आहे. आश्रम चेतननाथ यांनी बांधला असून, त्यांचे शिष्य अश्विनीकुमार हे त्यांच्या इतर शिष्यांसह वास्तव्य करतात. येथे साधु-महंत आदी अनेकजण येत असतात. भजन, किर्तन, जेवळ, पंगत वगैरे बसण्यासाठी जागा नाही, जागा खरेदी केल्याचा उतारा, घरपी आदी सातत्याने भरतात. या ठिकाणी १०० ते १५० मुर्ती येत असतात त्यासाठी त्यांची शेडची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावी अशी विनंती कोठारी महंत अश्विनीनाथ यांनी केली आहे. या आश्रमातर्फे सातत्याने होळीच्या दिवशी भंडार दिला जातो. तसा भंडारा यावर्षीदेखील करण्यात आला. सर्व शिष्यगण यावेळी हजर होते. (वार्ताहर)