शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

डेल्टा प्लस विषाणू धोकादायक; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत रुग्ण, ३५००० नमुन्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 06:22 IST

हरीश गुप्ता नवी दिल्ली :  नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव वेळीच न रोखल्यास भयानक परिणाम होऊ शकतात, हा ...

हरीश गुप्तानवी दिल्ली :  नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव वेळीच न रोखल्यास भयानक परिणाम होऊ शकतात, हा धोका ओळखून  केंद्र सरकारने या विषाणूचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायांसह पावले उचलली आहेत. या धोकादायक विषाणूचा जनुकीयक्रम जुळविण्यासाठी  महाराष्ट्रासह, गुजरात, दिल्ली आणि अन्य राज्यांतून ३५,००० नुमने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची केंद्र सरकारच्या  विविध प्रगत प्रयोगाशाळेत तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस नवीन स्वरूपाचा विषाणू आढळल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तावर बोलताना  भारताच्या राष्ट्रीय प्रतिक्षमीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे चेअरमन (एनटीएजीआय) प्रो. डॉॅॅ. एन. के. अरोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नवीन स्वरूपातील हा विषाणू आढळताच आम्ही तत्परतेने पावले उचलली आहेत. त्यामुळे  केंद्र सरकार राज्यांना सर्व व्यवहार  हळूहळू सुरू करण्याबाबत (अनलॉकिंग) सातत्याने बजावत आहे.  

स्थानिक निर्बंध लागू करून या  विषाणूचा प्रसार रोखण्यावर नवीन रणनीतीवर भर देण्यात आला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतही मोठ्या संख्येने डेल्टा प्लस विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत.  डेल्टा प्लस हा विषाणू  बी १.६१७.२ या विषाणूचे नवीन स्वरूप असून हा विषाणू अधिक धोकायदायक आणि संसर्गजन्य आहे, असे प्रो. अरोरा यांनी सांगितले.

हा चिंताजनक विषाणू असल्याचे अमेरिकने म्हटले आहे, तर ब्रिटन सरकारलाही लॉकडाऊन चार आठवड्यांनी वाढवावा लागला. महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी फेब्रुवारी-मार्चमध्येच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने या विषाणूने हातपाय पसरले. डॉ. साळुंके यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी कळविले होते; तसेच आयसीएमआरचे महासंचालक आणि कोविडवरील पंतप्रधानांच्या कृती गटाच्या प्रमुखांनाही फोनवरून याची कल्पना दिली होती.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत