शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:04 IST

मागच्याच आठवड्यात 2569 डेंग्यू रुग्णांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळत असली तरी, डेंग्यूच्या(Dengue) रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. राजधानी दिल्लीत(Delhi ) डेंग्यूच्या रुग्णांनी 5 वर्षांचा विक्रम मोडला आहे. दिल्लीत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 5 वर्षांतील डेंग्यूचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या दिल्लीत 5277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, डेंग्यूमुळे आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यंदा डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू

देशाच्या राजधानीत डेंग्यूमुळे आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. 2017 नंतर दिल्लीत डेंग्यूमुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. त्या वर्षी अधिकृतपणे 10 डेंग्यू रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमवारी महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवडाभरात 1170 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढया वर्षी डेंग्यूच्या 2700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी 1171 या महिन्याच्या 6 तारखेपर्यंतचे आहेत. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 1196 रुग्ण आढळले. या वर्षी 30 ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे एकूण 1537 रुग्ण होते आणि अधिकृत मृत्यूची संख्या सहा होती. अहवालानुसार, 9 नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 5277 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 2018 नंतर याच कालावधीतील डेंग्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये 217 रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या तीन वर्षांतील त्या महिन्यातील डेंग्यूची सर्वाधिक संख्या होती. 

टॅग्स :dengueडेंग्यूdelhiदिल्ली