शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:34 IST

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता. 

नवी दिल्ली - सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक युवक आल्या पाळीव कुत्र्याला हायड्रोजन (Hydrogen) असलेल्या फुग्यांना बांधून हवेत उडवतांना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच प्रकरण बिघडले आणि पोलिसांनी या युवकाला अटक केली. गौरव जोहन, असे या युवकाचे नाव होते. (Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon)

यूट्यूबसाठी तयार केला होता व्हिडिओ -माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता. 

काय आहे व्हिडिओत?या व्हिडिओत गौरवने कुत्र्याला हायड्रोडन गॅस असलेल्या फुग्यांना बांधले आहे आणि तो त्याला उडवताना दिसत आहे. कुत्रा धावू लागला, की थोडा-थोडा हवेत उडतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, PFA संस्थेने आरोपी गौरवविरोधात पशू क्रूरता (Animal Cruelty) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी गौरव आणि त्याच्या आईवर आयपीसीचे कलम 188, 269, 34 आणि पशू क्रूरता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गौरवला अटक करण्यात आली. 

हा व्हिडिओ गौरवने यूट्यूबवरून हटवला असला, तरी या व्हिडिओच्या क्लिप ट्विटरवर व्हायरल होत आहेत. ही घटना अमानवीय असल्याच्या प्रतिक्रिया लोक देत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राYouTubeयु ट्यूबTwitterट्विटरPoliceपोलिसArrestअटक