धक्कादायक ! दिल्लीतील महिलेवर राजस्थानमध्ये 23 जणांनी केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 18:02 IST2017-09-29T10:15:11+5:302017-09-29T18:02:48+5:30
राजस्थानच्या बिकानरेमध्ये नवी दिल्लीतील एका महिलेवर तब्बल 23 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक ! दिल्लीतील महिलेवर राजस्थानमध्ये 23 जणांनी केला सामूहिक बलात्कार
जयपूर - राजस्थानच्या बिकानरेमध्ये नवी दिल्लीतील एका महिलेवर तब्बल 23 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (28 सप्टेंबर ) एकूण सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 23 जणांनी बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेनं दोन दिवसांपूर्वी बिकानेरच्या पोलीस उपायुक्तांकडे केली होती. या 23 जणांपैकी दोन जणांचे नावही माहिती असल्याचे पीडितेनं सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित महिलेनं पोलीस उपायुक्त सवाई सिंह गोदारा यांची भेट घेतली आणि 23 जणांनी आपलं अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार तिनं नोंदवली. याप्रकरणी जय नारायण वियास कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला आहे.
Woman allegedly gangraped by 23 men in #Rajasthan's #Bikaner. Police register case pic.twitter.com/ZTrEOtL7YH
— ANI (@ANI) September 29, 2017