पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:09 IST2025-05-23T08:07:24+5:302025-05-23T08:09:18+5:30

केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नेपाळी वंशाचे एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि त्याचा सहकारी अखलाक आझम यांना अटक करण्यात आली आहे.

Delhi was the target before the Pahalgam attack, ISI agent Ansarul Mian revealed during interrogation | पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड

पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड

केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या आयएसआय नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान केलेल्या कारवाईत, आयबीने १५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतून नेपाळी वंशाचा एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि ३ मार्च रोजी रांची येथून त्याचा सहकारी अखलाक आझम याला अटक केली. ही अटक जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारुल मियाँ दिल्लीतील अनेक ठिकाणांची रेकी करत होता कारण तो राजधानीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होता. अखलाक अन्सारुलला भारतीय लष्कराची कागदपत्रे आयएसआय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करत होता.

झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल विशेष कक्षाने त्यांच्याविरुद्ध अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अन्सारुलला मध्य जिल्ह्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली जेव्हा तो पाकिस्तानला पळून जाण्याचा विचार करत होता. त्याच्या ताब्यातून भारतीय सैन्य आणि सशस्त्र दलांशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. आयएसआयने अन्सारुलला या कागदपत्रांची सीडी बनवून पाकिस्तानला पाठवण्याचे निर्देश दिले होते, यामध्ये त्याचा मित्र अखलाक याचीही समावेश होता. दिल्ली पोलिसांनी एप्रिलमध्ये आरोपपत्र दाखल केले असून दोघेही सध्या तिहार तुरुंगात आहेत.

 या चौकशीत देशात इतर अनेक आयएसआय एजंट लपून बसल्याचे समोर आले. केंद्रीय तपास संस्था त्यांचा शोध घेत आहेत. अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान सांगितले की, तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. तिथून तो कतारला पोहोचला आणि कॅब ड्रायव्हर म्हणून काम केले, तिथे त्याची भेट एका आयएसआय हँडलरशी झाली. यानंतर त्याला पाकिस्तानात नेण्यात आले, तिथे आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला विशेष प्रशिक्षण दिले.

सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली

अन्सारुलचे मुख्य ध्येय भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे गोळा करणे आणि ती पाकिस्तानला पाठवणे होते. गेल्या काही दिवसात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे, यात हिसारमधील युट्यूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. तिच्यावर संवेदनशील माहिती शेअर करण्याचा आणि पाकिस्तानी नागरिकाच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप आहे.

Web Title: Delhi was the target before the Pahalgam attack, ISI agent Ansarul Mian revealed during interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.